omkar lokhande.jpg 
पुणे

शेतकऱ्याच्या पोराची गरूड भरारी; तुम्हीही म्हणाल शाब्बास पोरा

डी. के. वळसे पाटील

मंचर, (पुणे) : नाशिक रोड-गांधीनगर येथील काँम्बट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये (कॅट्स) १७ आठवड्यांचे लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण करून 45 वैमानिकांची ३३ वी तुकडी शनिवारी (ता. ६) सेवेत दाखल झाली. यामध्ये जाधववाडी-बोरी बुद्रुक (ता. जुन्नर जि. पुणे) येथील शेतकरी कुटुंबातील कॅप्टन ओंकार गुलाबराव लोखंडे यांनी मानाचा सिल्वर चित्ता व उत्कृष्ट उड्डानाबद्दल दिले जाणारे प्रथम क्रमांकाचे चषक पटकाविले. ते ताशी २५० किलोमीटर वेगाने लढाऊ  हेलिकॉप्टर चालविणार आहेत. त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीचा नावलौकिक वाढविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

कमांडर ब्रिगेडियर सरबजीत सिंग यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना हवाई बिंग प्रदान करण्यात आले. तसेच उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी वैमानिकांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी होणारी पासिंग आऊट परेड या वर्षी रद्द करण्यात आली. तसेच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा दिला जाणारे मानाचा सिल्वर चिन्ह हेलिकॉप्टरची प्रतिकृती लोखंडे यांना प्रदान करण्यात आली आहे.

कॅप्टन लोखंडे यांनी यापूर्वी  झाशी येथील हवाई तळावर झालेल्या पूर्व प्रशिक्षणात ओवर ऑल बेस्ट हा किताब मिळविला होता. त्यांची नेमणूक लवकरच देशातील  एका हवाई तळावर होणार आहे. "लहानपणापासूनच मला देशासाठी लष्करी सेवेत जाण्याची इच्छा होती.मला लष्करात जाण्यासाठी लहानपणापासूनच वडील गुलाबराव, आई सुनंदा, बहिण क्षितीजा यांची प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला. त्यादृष्टीनेच मी अभ्यास करत होतो. इयत्ता १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्यातील एनडीए येथे प्रवेश घेतला. तेथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंडियन मिलेट्री अकॅडमी देहरादुन तसेच हवाई प्रशिक्षण झासी व नाशिक येथे पूर्ण केले. ४ वर्ष प्रशिक्षण घेतले आहे. लढाऊ हेलिकॉप्टरचा ताशी वेग २५० किलोमीटर आहे. देशसेवा करण्याची संधी मिळणार आहे".असे कॅप्टन ओंकार गुलाबराव लोखंडे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Quota Conflict: मराठा आरक्षण मूळ ओबीसींच आरक्षण कसं खाणार...? पुढच्या १० वर्षात भीषण परिस्थिती, अभ्यासक काय म्हणतात?

Latest Marathi News Updates : - घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग, २० सप्टेंबरपासून पासचे नवे दर लागू, नवरात्रोत्सवाआधी मोठा निर्णय

भाजप नेत्याच्या मुलावर गोळीबार; प्रेयसीच्या घरी मध्यरात्री भेटायला गेल्यावर तिच्या वडिलांनी झाडल्या गोळ्या? मारहाण झाल्याचाही संशय

Pink E-Rickshaw Scheme: पिंक ई-रिक्षाचा वेग नागपुरात ‘स्लो’; १४०० पैकी केवळ सोळाच रस्त्यावर, महिलांना स्वावलंबी बनविणारी योजना

SCROLL FOR NEXT