Car Accident Jaykumar Gore Injured esakal
पुणे

Jaykumar Gore : भीषण अपघातात जखमी झालेले भाजप आमदार पुन्हा 'रूबी'मध्ये दाखल; असं काय घडलं?

फलटण येथील भीषण अपघातात आमदार गोरे गंभीर जखमी झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

फलटण इथं गेल्या १४ दिवसांपूर्वी भीषण अपघातात (Car Accident) आमदार गोरे जखमी झाले होते. त्यांच्या पाय आणि छातीच्या बरगड्यांना इजा झाली होती.

बिजवडी (सातारा) : गेल्या दोन दिवसांत दगदग झाल्याने आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या छातीतील वेदना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. रूबी हॉल क्लिनिकच्या (Ruby Hall Clinic) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना शुक्रवारी रात्री पुन्हा पुण्याला हलविण्यात आलं आहे.

फलटण इथं गेल्या १४ दिवसांपूर्वी भीषण अपघातात (Car Accident) आमदार गोरे जखमी झाले होते. त्यांच्या पाय आणि छातीच्या बरगड्यांना इजा झाली होती. रूबी हॉल क्लिनिकमध्ये बारा दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. गुरुवारी त्यांना एअर ॲम्ब्युलन्सनं बोराटवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आलं होतं.

काल आणि आज प्रवास, तसंच खूप दगदग झाल्यानं त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. रूबी हॉल क्लिनिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्थानिक डॉक्टरांनी आमदार गोरेंवर उपचार केले. त्यांना पुढील उपचारासाठी रात्री उशिरा पुण्याला हलविण्यात आलं. दोन दिवसांत आमदार गोरेंना पुरेशी विश्रांती मिळाली नाही. हालचाल वाढल्यानं त्यांच्या छाती आणि पायाला वेदना होऊ लागल्या आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असं आवाहन सोनिया गोरे यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्री! रात्री उशिरा मुंबईकडे रवाना; प्रथमच महिलेकडे पद

काटेवाडी ते मंत्रालय... नेतृत्वासाठी तयार झालेलं व्यक्तिमत्त्व; सामाजिक कार्यकर्ता ते उपमुख्यमंत्रीपद, सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक प्रवास

Mumbai Traffic: मुंबईत १ तारखेपासून नवीन वाहतूक नियम; दक्षिण भागात अधिक कठोर नियम, 'या' वाहनांना प्रवेश नाही

Budget 2026: बजेट तयार करण्यासाठी किती वेळ लागतो? ‘ब्लू शीट’ म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या पडद्यामागची प्रक्रिया...

Pune Traffic : नवले पुलावर तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान लेन बंद; कात्रज जुना बोगदा आणि सेवा रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT