पानशेत : धरणाच्या पाण्यात कार बुडाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. Sakal Media
पुणे

पानशेत धरणात बुडाली कार; महिलेचा मृत्यू पती, मुलगा बचावले

अचानक टायर फुटल्यानं कार रस्त्याच्या बाजूला घसरत जाऊन पाण्यात बुडाली

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : रस्त्यावरुन जात असताना अचानक टायर फुटल्याने कार रस्त्याच्या कडेला घसरत जाऊन पानशेत धरणाच्या पाण्यात कार पडली. या अपघातात कारमधील महिलेचा मृत्यू झाला तर पती आणि मुलगा वाचले आहेत. वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ही माहिती दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्यातील शनिवार पेठ परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील समृद्धी योगेश देशपांडे (वय ३३) या महिलेचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्यांचे पती योगेश देशपांडे (वय ३५) आणि मुलगा (नाव महिती नाही, वय ९) हे यातून बचावले आहेत. ही दुर्घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-कुरण-वेल्हे या रस्त्यावरील कादवे या ठिकाणी ही घटना घडली. या कारमध्ये तिघे जणच प्रवास करत होते.

प्राथमिक माहितीनुसार, देशपांडे कुटुंबातील हे तिघेजण पुण्याहूण पानशेत परिसरात पर्यटनासाठी आले होते. कुरण गावाच्या पुढे आल्यावर एका हॉटेलवर ते थांबले त्यानंतर त्यांनी कार धरणाच्या बाजूला नेली. पाऊस असल्याने ते कारमध्ये बसले होते, कारमध्येच त्यांनी नाश्ता केला. त्यांनतर दुपारी दोन वाजता ते पुढे कादवे गावाच्या दिशेने निघाले. योगेश कार चालवत होते आणि त्यांच्या शेजारी मुलगा बसला होता. मागे पत्नी समृद्धी बसल्या होत्या. धरणाच्या पाण्याच्या बाजूने कार चाललेली असताना अचानक कारचा टायर फुटल्याने योगेश यांनी कारवरील नियंत्रण गमावलं आणि कार रस्ता सोडून पाण्यात जाऊन पडली. सुरुवातीला काही वेळ कार पाण्यात तरंगत होती. पण नंतर पाणी आतमध्ये शिरल्याने कार पाण्यात बुडाली. यावेळी पुढच्या बाजूच्या दो्नही खिडक्या उघड्या असल्याने योगेश आणि त्यांचा मुलगा हे दोघेही पाण्याबाहेर पडले. पण मागील दरवाजाची काच बंद असल्याने समृद्धी यांना बाहेर पडता आलं नाही.

मोठा आवाज झाल्याने शेजारील हॉटेलमधील वैभव जागडे, अक्षय जागडे, आदित्य लोणारे, तर धरणात मासे पकडणारे नामदेव काटकर हे सर्वजण धावत घटनास्थळी पोहोचले. हॉटेलमधील दोरी घेऊन वैभव जागडे याने पाण्यात उडी मारली. त्याने गाडीच्या टायरला दोरी बांधली आणि ती झाडाला बांधली, त्यामुळे कारने तळ गाठला नाही. त्यांनी पुढच्या खिडकीतून समृद्धी यांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही. वैभवने कारच्या जॅकनं मागच्या बाजूच्या खिडकीची काच फोडून समृद्धी यांना बाहेर काढले. त्यानंतर, गावातील गणेश फाळके यांच्या कारमधून त्यांना तातडीने पानशेत येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच समृद्धी यांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT