Pune-Police 
पुणे

पुणे : खोटी माहिती देऊन काढत होते डिजीटल पास, मग पोलिसांनी...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी नागरीकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या डिजीटल पास/ डिजीटल परवानगीसाठी काही जणांनी पोलिसांना खोटी माहिती दिल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यापैकी ६ जणांविरुद्ध गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामे असणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्हॉटसअप व डिजीटल पास/डिजीटल परवानगीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार नागरिक www.punepolice.in या लिंकवर आपली माहिती भरून पास घेऊन आपले काम मार्गी लावत आहेत.

परवानगीसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये वैद्यकीय कारणासाठी परवानगी देण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार, कर्करोग रुग्ण १५६८, अतिदक्षता कक्षातील रुग्ण ११७४, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण १०४३, डायलिसिस रुग्ण ३४३, मधुमेही रुग्ण ४१८, प्रसूतीसाठी २६९१, लहान मुलांना रुग्णालयात नेणे ६१९ इतक्या प्रमाणत परवानगी देण्यात आली.

दरम्यान, काही जणांकडून परवानगी घेण्यासाठी अर्ज करताना आधार कार्ड चुकीचे दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांची चौकशी केल्यानंतर संबंधित लोकांनी पास मिळण्यासाठी ९१७ जणांनी आधार कार्ड विषयी खोटी माहिती भरल्याचे स्पष्ट झाले. त्यांना मेसेज पाठवून दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले. त्यातील काही अर्जांची पोलिस उपआयुक्त बच्चन सिंग यांनी पडताळणी केली, तेव्हा त्यांना संशयास्पद अर्ज मिळाले. त्यानुसार त्यांनी त्यांची चौकशी केली. त्यामध्ये ६ जणांनी कोणतेही अत्यावश्यक काम नसतानाही अर्ज केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती बच्चन सिंग यांनी दिली.

डिजीटल पास/ डिजीटल परवानगीबाबतची माहिती : 

* एकूण प्राप्त अर्ज - ३ लाख १८ हजार
* परवानगी देण्यात आलेले अर्ज - १ लाख ७३ हजार
* अत्यावश्यक सेवांसाठी सूट दिलेलं अर्ज - १ लाख ७ हजार
* अन्य प्रकारची परवानगी - ४७ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: मुंबईचा आयुष म्हात्रे आता विश्वविजेता कर्णधार! मोहम्मद कैफ, विराट कोहलीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

U19 World Cup: सचिन तेंडुलकर ते विराट कोहली... आयुष म्हात्रेच्या चॅम्पियन टीमबद्दल अन् वैभव सूर्यवंशीबद्दल कोण काय म्हणालं? पाहा

U19 World Cup: आयुष म्हात्रेच्या टीम इंडियाने जगज्जेतेपद जिंकताच कसं केलं सेलिब्रेशन; Video Viral

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT