Case filed against In Laws due to harassment of Daughter in law 
पुणे

मुलगी झाली म्हणून सासरच्यांनी केला विवाहितेचा छळ

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुनी सांगवी येथे घडला. पती अविनाश आनंद चौधरी, सासू आशा आनंद चौधरी, सासरा आनंद चौधरी, दीर अमोल चौधरी, जाऊ स्वप्नाली अमोल चौधरी (सर्व रा. मधुबन सोसायटी, जुनी सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पुण्यात वर्दीची कॉलर पकडून पोलिसास मारहाण
 

लग्नाच्या वेळी आरोपींनी घर व मोटार स्वतःची असल्याचे खोटे सांगून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांची फसवणूक केली. तसेच फिर्यादीच्या पतीचे लग्नापुर्वी प्रेमसंबंध असल्याचे फिर्यादीला समजल्याने आरोपींनी त्यांच्याशी वाद घालून मारहाण केली. यासह 6 ऑक्‍टोबर 2016 ला फिर्यादीला मुलगी झाल्याने आरोपींनी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT