antiques
antiques Sakal Media
पुणे

चावंड गडावर पुरातन वस्तूंचा शोध घेणारा जुन्नर वनविभागाच्या कोठडीत

दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : ऐतिहासिक चावंड गडावर मेटल डिटेक्टरच्या मदतीने पुरातन वस्तूंचा शोध घेणाऱ्यास चावंड ग्रामस्थांनी रविवारी (ता. १६) रंगेहात पकडून जुन्नर वनविभागाच्या स्वाधीन केले आहे. विक्रम शांताराम हाडवळे, रा. डुंबरवाडी-ओतुर, (ता. जुन्नर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. चावंडचे पोलिस पाटील स्वरूप शेळकंदे, ग्रामस्थ मारुती उतळे, संदीप भालचिम, शिंगाडे आदींनी चावंड गडाच्या पायथ्याशी वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक सचिन कवटे, वैभव वाजे यांच्या स्वाधीन केले.

आरोपी सकाळी गडावर गेला होता. त्याच्याकडे असणाऱ्या मेटल डिटेक्टरच्या मदतीने त्याने गडावर दोन-तीन ठिकाणी उत्खनन केले असल्याचे आढळून आले आहे. यात त्याला तोफगोळ्याचे अवशेष व नाणे मिळून आले. याचा पंचनामा करण्यात आला आहे. ग्रामस्थांना त्यांच्याबाबत संशय आला होता यामुळे तो सायंकाळी खाली आल्यानंतर त्यांचेकडे त्यांनी चौकशी केली नंतर वनविभागाच्या ताब्यात दिले.

त्याच्याकडे एक मेटल डिटेक्टर, लोखंडी गज, लहान कुदळ, दोरी, तसेच लोखंड सदृश्य धातूचे तुटलेले तुकडे, पुरातन नाणेरूपी धातूचे अवशेष आदी वस्तू मिळून आल्या असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले. पुरातत्व विभागाचे साहय्यक संचालकांना पुरातन वस्तू ताब्यात घेण्यासाठी वनविभागाने कळविले आहे. वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रात बेकायदेशीर प्रवेश करून ऐतिहासिक वस्तूंची शोधाशोध करणे,उत्खनन करणे आदी आरोपापरून भारतीय वन अधिनियमान्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने यापूर्वी असे काही गुन्हे केले आहेत का ? याबाबत उपवनसंरक्षक संजय कडू सहायक वनसंरक्षक के. एल. भिसे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT