CBSE_Students 
पुणे

CBSE बोर्डच्या विद्यार्थ्यांनो, परीक्षांच्या तारखा गुरुवारी होणार जाहीर!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशभरातील लाखो विद्यार्थी सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. मात्र आता केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी येत्या गुरुवारी (ता.31) सीबीएसईच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनाची प्रतीक्षा वर्षाअखेरीस संपणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सीबीएसईच्या परीक्षा यंदा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये होणार नाहीत, हे यापूर्वीच जाहीर करण्यात आले. परीक्षांच्या तारखा नंतर कळविल्या जातील, असेही डॉ. पोखरियाल यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तसेच परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असेही यानिमित्ताने अधोरेखित करण्यात आले होते. त्यामुळे सीबीएसईच्या परीक्षा कधी होणार? याकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, सीबीएसईच्या परीक्षांच्या तारखा गुरूवारी जाहीर करणार असल्याचे ट्विट डॉ. पोखरियाल यांनी केले असून त्यावर पालक आणि विद्यार्थ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये सीबीएसईच्या परीक्षा मे महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून प्रामुख्याने होत असल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी देशभरातील जवळपास 17 ते 18 लाख विद्यार्थी सीबीएसईची दहावीची, तर जवळपास 11 ते 12 लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देतात. साधारणत: देशभरातील 28 ते 30 लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालकांचे लक्ष सध्या सीबीएसईच्या परीक्षांच्या तारखाकडे लागले आहे.

"कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून विद्यार्थी हे शाळेत गेलेले नाहीत. सगळे वर्ग ऑनलाईन भरविले जात आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम पुर्ण करण्यात आणि परीक्षेची तयारी करण्यात असंख्य अडचणी येत आहेत. हे लक्षात घेऊन सीबीएसईच्या परीक्षा मे महिन्यापर्यंत पुढे ढकलाव्यात.''
- नमन अग्रवाल

"परीक्षांचा कालावधी जाणून घेण्याची उत्सुकता विद्यार्थी, पालकांना आहेच. परंतु परीक्षेपूर्वी किमान तीन महिने तरी अगोदर तारखा जाहीर करणे गरजेचे आहे. तरच विद्यार्थ्यांना परीक्षेची पुरेशी तयारी करायला वेळ मिळेल. विद्यार्थ्यांना आतापर्यंत ऑफलाईन शिक्षणाची सवय होती. परंतु कोरानामुळे विद्यार्थ्यांना संपुर्ण शैक्षणिक वर्षात ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. परिणामी परीक्षेसाठी अधिक चांगली तयारी करायला पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे.''
- दीपा पवार

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

Latest Marathi News Live Update: जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Election Commission: उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार? काय आहे अपडेट?

Kartiki Ekadashi 2026 : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरच्या विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; 'या' वेळेस फक्त काही मिनिटेच मिळणार दर्शन!

SCROLL FOR NEXT