Military Recruitment Office Pune 
पुणे

लष्कराच्या सैन्य दलातील भरतीसाठी हडपसर येथे 'सीईई' परीक्षा

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यातील सैन्य भर्ती कार्यालयाच्या वतीने सैनिक भरतीसाठी 'एकत्रित प्रवेश परीक्षा' (सीईई) ठेवण्यात आली आहे. ही परीक्षा हडपसर येथील 'एआयपीटी'च्या आवारात 1 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली असून यामध्ये जनरल ड्युटी, ट्रेड्समेन (व्यापार) आणि तांत्रिक विभागासाठी ही परीक्षा घेतली जात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या परीक्षेसाठी पुणे, लातूर, बीड, अहमदनगर व उस्मानाबाद या पाच जिल्ह्यातील दोन हजार 200 हून अधिक उमेदवार सहभाग घेणार आहेत. या उमेदवारांनी सैन्य भरती प्रक्रियेसाठी शारीरिक चाचणी व वैद्यकीय परीक्षा हे पहिले दोन टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करून सीईई या लेखी परिक्षेसाठी पात्रता मिळवली आहे. दरम्यान परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोविड 19 संबंधित मार्गदर्शन तत्वांचे आणि केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करणे तसेच सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचा आदेश सेना भरती कार्यालयातर्फे देण्यात आले आहे.

ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर रेजिमेंट्समध्ये पाठविले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया मार्च 2021 पर्यंत पूर्ण केली जाईल, असेही कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT