Lockdown-Pune-Railway-Station 
पुणे

... तोपर्यंत रेल्वे स्टेशनवर विनाकारण गर्दी करू नका; रेल्वे प्रशासनाने घेतलाय 'श्रमिक स्पेशल' निर्णय!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आंतरजिल्हा किंवा परराज्यांत ज्यांना प्रवास करायचा आहे, त्यांना शासकीय यंत्रणांकडून जोपर्यंत कळविले जाणार नाही, तोपर्यंत राज्यातील रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, असे आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वेने केले आहे.

लॉकडाऊनमुळे देशात विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना हलविण्यासाठी रेल्वेने 'श्रमिक स्पेशल' गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ज्या राज्यात कामगार अडकले आहेत आणि त्यांना ज्या राज्यात जायचे आहे, तेथील राज्य सरकारने या बाबत परस्पर समन्वयाने या बाबतचे नियोजन करायचे आहे. त्या साठी रेल्वे प्रशासन स्वतंत्र अधिकारी नियुक्त करेल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

या प्रवाशांची आरोग्य तपासणी दोन्ही राज्यांनी रेल्वे स्थानकावर करायची आहे. तसेच या बाबतचे नियोजन पूर्ण झाल्यावर श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी सोडण्यात येईल, असे ही रेल्वेने म्हटले आहे. देशात सर्वाधिक स्थलांतरित कामगार मुंबईमध्ये अडकले आहेत. 

श्रमिक स्पेशल रेल्वे गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला परवानगी घ्यावी लागणार आहे. त्या परवानगीची खातरजमा करूनच त्यांना रेल्वेच्या डब्यात प्रवेश देण्यात येईल. त्या बाबत संबंधित जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. तेथे नोंदणी झाल्यावर त्या प्रवाशांना रेल्वे गाडीची वेळ कळविण्यात येईल, त्यानंतरच त्यांनी स्थानकावर यायचे आहे, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. स्थानकांवर विनाकारण गर्दी करून कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका, असे आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना केले आहे. 

मजुरांसाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे, अशी अफवा पसरल्यावर मुंबईत वांद्रे स्थानकावर गेल्या महिन्यात सुमारे पाच हजार प्रवासी गोळा झाले होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आता खबरदारी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बँका कधी सुरू, कधी बंद? अनंत चतुर्दशीला बँकाना सुट्टी? पाहा पूर्ण अपडेट

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Ganeshotsav Nigeria: सातारच्या सुपुत्राने नायजेरियात रुजवली गणेशोत्सवाची परंपरा; १६ वर्षांपासून लागोसमध्ये बाप्पाचा जयघोष, सातासमुद्रापार मराठी मातीचा सुगंध

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT