Chandrakant Patil 
पुणे

केंद्र सरकारची इंधन दरवाढ योग्यच; चंद्रकांत पाटील यांच्याकडून समर्थन

सकाळवृत्तसेवा

पुणे - केंद्रातील योजनांसाठी पैसा कोठून आणायचा, असा प्रश्‍न मांडत पेट्रोल, डिझेलवर सेस लावून इंधन दरवाढीच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी समर्थन केले. इंधन दरवाढीमुळे लोकांचे हाल होतील, या प्रश्‍नावर बोलणे पाटील यांनी टाळले. 

कोथरूड विधानसभा मतदारसंघासह शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी पाटील यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर आदी उपस्थितीत होते. पेट्रोल आणि डिझेलवरील सेसमुळे इंधन दरातील वाढ सामान्यांना महागाईला तोंड द्यावे लागणार असल्याकडे पाटील यांचे लक्ष वेधले; तेव्हा या तरतुदीचे पाटील यांनी समर्थन केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाटील म्हणाले, ‘‘पीककर्जासाठी सुमारे ७५ हजार कोटींची तरतूद केल्याने शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागणार नाही. आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी ४० हजार कोटींची तरतूद आहे. उद्योगांतील सवलतीमुळे लघुउद्योगांना फायदा होईल.’’

नगरसेवक नाराज नाहीत
पुणे महापालिकेतील भाजपच्या काही नगरसेवकांच्या अडचणी आहेत. त्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला भेटणार आहे. मात्र, भाजपचा एकही नगरसेवक नाराज नसल्याचे पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. भाजपचे नगरसेवक नाराज असल्याने कामांचे निमित्त करून पालकमंत्री अजित पवार यांना भेटत असल्याबाबत पाटील यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा पाटील यांनी महापालिकेतील पदाधिकारी, त्यांचे काम, पक्षाच्या नगरसेवकांच्या अपेक्षा यावर आपली भूमिका मांडली.

कॉलनीपुरती योजना राबवावी 
शहरातील सहा मीटर रस्त्यांची रुंदी नऊ मीटर करण्याआधी ‘एफएसआय’ देण्याची गरजही पाटील यांनी व्यक्त केली. सहा मीटर रस्ता रुंदीकरणासाठी राज्य सरकारने ‘एफएसआय’ द्यावा, अशी मागणीही पाटील यांनी केली. जिथे गरज नाही, तिथे रस्त्यांचे रुंदीकरण नको. केवळ कॉलनीपुरती ही योजना राबवावी, असेही पाटील यांनी सांगितले. 

शरद पवार यांच्यावर टीका
कृषी विधेयकांबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आता चर्चेची अपेक्षा करीत आहे. मात्र, जेव्हा हे कायदे मंजूर झाले, तेव्हा ते संसदेत नव्हते. चर्चेसाठी त्यांनी राज्यसभेत हजर राहायला हवे होते, असा टोला पाटील यांनी हाणला.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

SCROLL FOR NEXT