Khandoba Temple  Google file Photo
पुणे

खंडोबाच्या नावानं चांगभलं! रिंग रोड-रोपवेसाठी केंद्राकडून 56 कोटी

प्रस्तावित रोप-वेमुळे वयस्कर आणि दिव्यांग लोकांना खंडोबा देवस्थान देवदर्शन सहज शक्य होणार आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान मंदिर रिंगरोड (धामणटेक ते मंदिर, मंदिर ते निमगाव गावठाण ते दावडी व पुन्हा धामणटेक) असा रिंगरोड आणि रोपवे मार्ग या कामांना केंद्रीय मार्ग निधीतून ५६ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. केंद्री‌य रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. खंडोबा मंदिर पायथ्याशी सुसज्ज असे हेलिपॅड आणि रेस्ट हाऊस तसेच खंडोबा मंदिर पायथ्याशी रोपवे स्टेशनशेजारी भव्य बगीचा, स्वच्छतागृह, भक्त निवास, वृक्षारोपण त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये हायमॅक्स लाइट इत्यादी सुविधा करण्यात येणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

खेड ते मंदिर खरपुडीमार्गे रस्ता व पिंपळगाव ते दावडी मार्गे मंदिर रस्ता हेदेखील होणार आहे. रिंगरोडच्या कामांमुळे खंडोबा देवस्थान हे पुणे-नाशिक व पुणे-नगर या दोन राष्ट्रीय महामार्गांना अत्यंत जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहे. तसेच भीमाशंकर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव ही अष्टविनायक व ज्योतिर्लिंग क्षेत्रे व यमाई देवस्थान, कनेरसर खंडोबा देवस्थानाशी जवळच्या अंतराने जोडली जाणार आहेत.

दिव्यांगांना खंडोबा दर्शन

प्रस्तावित रोप-वेमुळे वयस्कर आणि दिव्यांग लोकांना खंडोबा देवस्थान देवदर्शन सहज शक्य होणार आहे. या कामांमुळे खेड तालुक्यातील पर्यटन, औद्योगिक व कृषी क्षेत्रांच्या विकासास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Malegaon News : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; अजित दादांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वीकारली जबाबदारी

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये अमेरिका इराण युद्धाची झळ,गॅससाठी नागरिकांची मोठी गर्दी

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

SCROLL FOR NEXT