corona.jpg 
पुणे

Big Breaking : पुण्यात केंद्रीय आरोग्य विभागाचं पथक दाखल; दिल्या महत्त्वाच्या सूचना

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल झाले असून, या पथकाच्या सदस्यांनी आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासोबत याविषयी सविस्तर चर्चा केली.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये तातडीने सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे तसेच आवश्यकते नुसार क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना क्रेंदीय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त उपमहासंचालक    डॉ. सुधीर गुप्ता यांनी  केल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कोविड 19 ची वाढती रुग्ण संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी करावयाचे नियोजन याबाबत आढावा बैठक घेऊन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक उप महासंचालक डॉ. मानस रॉय, वरिष्ठ क्षेत्रीय संचालक डॉ. अरविंद अलोणे उपस्थित होते.

डॉ. गुप्ता म्हणाले, ''केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करुन पुणे जिल्हयाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा व माहिती घेणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांची रुग्णालये तसेच ससून, भारती हॉस्पिटल आदी कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना भेटी देवून पाहणी करणार आहोत.

यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी  पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हयात वाढत असणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या बैठकीस आरोग्य उपसंचालक डॉ.संजय देशमुख, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. आर. एस. आडकेकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT