Central team in Baramati after two months of heavy rains 
पुणे

अतिवृष्टीच्या दोन महिन्यानंतर केंद्रीय पथक बारामतीत 

मिलिंद संगई

बारामती : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आज तब्बल दोन महिने उलटून गेल्यावर केंद्रीय पथक बारामतीत आले होते. या पथकाच्या पाहणीबद्दल लोकांनी खिल्ली उडवत दोन महिन्यानंतर पथक कसली पाहणी करणार असा प्रश्न उपस्थित केला. 

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याला अखेर दोन महिन्यानंतर केंद्रीय पथकाला आज वेळ मिळाला. अतिवृष्टीने तालुक्यात पिकांसह शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र दोन महिन्यानंतरच्या या पाहणी दौ-याचा नेमका काय उपयोग, पथक कशाची पाहणी करणार आणि काय अहवाल देणार असाच प्रश्न लोकांनी उपस्थित केला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन महिन्यात सगळीच स्थिती पूर्ववत झालेली आहे, त्या मुळे त्या वेळेसची परिस्थिती काय होती हे या पथकला कसे समजणार, त्यांना नुकसानीचा अंदाज तरी कसा येणार असेही प्रश्न उपस्थित केले गेले. 

जी.रमेशकुमार आणि आर.बी.कौल यांचा केंद्रीय पथकात समावेश होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय कृषिअधिकारी बालाजी ताटे, तहसिलदार विजय पाटील, तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अधिकारी विश्वास ओहोळ यावेळी उपस्थित होते. 

पुण्यात आलेला गवा कसा गेला, वाचा सविस्तर​

कऱ्हावागज येथील कऱ्हा नदीवरील पुलाच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जळगाव कडेपठार येथील शेती व पिकांच्या नुकसानीची पाहणी पथकाने केली. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील शेतीसह पिकांचे, घरांचे व पशुंचे मोठे नुकसान झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

Kunbi Certificates: ''भुजबळांना कुणबी प्रमाणपत्रांबद्दल आक्षेप असेल तर..'', फडणवीसांनी स्पष्टच शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT