mohol patil pawar.jpg 
पुणे

चंद्रकांत दादांकडून महापौरांना शंभर मार्क तर अजितदादांना भोपळा

ज्ञानेश सावंत

पुणे : पुण्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असला तरी, पुणेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या उपाय योजनांबाबत समाधान व्यक्त करीत भारतीय जतना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळांना शाबासकी दिली आहे. आटोक्‍यात ठेवण्याच्या मोहोळांच्या प्रयत्नांना पाटील यांनी शंभर "मार्क' दिले. त्याचवेळी पालकमंत्री म्हणून अजित पवारांच्या कामगिरीबाबत पाटलांनी नाराजी व्यक्त केली. पवार बोलतच नाहीत; ते का बोलत नाहीत ? हे कळत नाही, असा टोलाही पाटलांनी पवारांना हाणला.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील वर्षपूर्तीनिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा पाटील यांनी "झूम'द्वारे पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या वर्षभरातील मोदी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ठाकरे सरकारला केलेल्या मदतीची आकड्यानिशी माहितीही पाटलांनी दिली. त्याचवेळी त्यांनी ठाकरे सरकारबद्दल नाराजीचा सूरही ठेवला. तेव्हा पुण्यातील स्थितीबाबत महापौर मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री अजित पवार यांचे निर्णय, परिणामासंदर्भात विचारले असता, पाटील मोहोळांवर खूष तर पवारांच्या कामाकडे बोट दाखविले.


पाटील म्हणाले, ""पुण्यातील कोरोनाचे रुग्ण वाढले असतानाही आपला आणि कुटुंबियांचा विचार न करता महामौर मोहोळ खूप काम करीत आहेत. त्यांची निर्णय प्रक्रिया महत्त्वाची ठरली आहे. खबरदारी म्हणून मोहोळ यांनी केलेल्या उपाययोजनाही चांगल्या आहेत. त्यामुळे त्यांना पूर्ण शंभर "मार्क' असतील.'' त्याचक्षणी अजित पवारांच्या कामाचा झपाटा आता दिसत नाही. ते निर्णय घेत नाहीत. त्यांच्या कामाची स्टाइल आता कुठे दिसत नाही. ते बोलतच नाही. ते का माहित नाहीत. त्यावर मी सविस्तर बोलणार आहे '' अशा शब्दांत पाटलांनी पवारांवर निशाणा साधला.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

 दरम्यान, राज्यातील कोरोनाचे सकंट हातळण्यात सरकार केंद्राचाच निधी वापरत आहे. राज्य सरकारच्या पैशांतून कोणतीच कामे केली जात नाहीत, असा ठपका पाटील यांनी ठाकरे सरकारवर ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Multibagger Stock: एका आठवड्यात शेअर 24% वाढला! 1 रूपयाच्या या शेअरने 5 वर्षात 1 लाखाचे 10 लाख केले

World Cup 2027 खेळण्यासाठी चुरस वाढली! १० जागांसाठी मोठमोठ्या संघांमध्येही मारामारी

Latest Marathi News Live Update : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’; राबवली ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

SCROLL FOR NEXT