Chandrakant Patil 
पुणे

सत्ता टिकावयाची असेल तर रक्तातील नातेवाइकाला नाकारून नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘महापालिकेतील सत्ता टिकावयाची असेल, तर तीन टर्म उमेदवारी दिलेल्या आणि रक्तातील नातेवाइकाला नाकारून नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे,’’ असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. नगरसेवक कशाला व्हायचे, समाजसेवेसाठी की रिंग करण्यासाठी,’ असा प्रश्‍नही यावेळी पाटील यांनी केल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शहर भाजपकडून मंडलनिहाय (मतदार संघ) अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार रविवारी पर्वती आणि शिवाजीनगर या दोन मंडलाचा अभ्यास वर्ग झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार, सोशल मीडियाचे महत्त्व, केंद्र सरकारच्या योजना, गेल्या पाच वर्षांत राज्यातील सत्तेत असताना पक्षाने केलेली कामे आणि महापालिकेतील चार वर्षांतील कारभारावर या अभ्यास वर्गात चिंतन करण्यात आले. या अभ्यास वर्गात पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाटील यांनी जुन्यांना फाटा आणि नव्यांना सधी देण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अनेकांचे धाबे दणाणलेले आहेत. तर ठेका मिळविण्यासाठी रिंग केली जात असल्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अनेक नगरसेवकांनी खासगीत नाराजी व्यक्त केली. महापालिका निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. भाजपमध्ये सध्या असलेल्या अनेक नेत्यांची मुले, पत्नी, भाऊ आणि नातेवाईक इच्छुक आहेत. पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे.

गुजराथ आणि दिल्ली येथील महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. कोणीही कितीही मोठा नेता असो, त्याच्या रक्तातील नात्यामध्ये उमेदवारी न देण्याबाबतचा निर्णय घेतला. त्यामुळे तेथील महापालिकेतील सत्ता टिकली. या पॉलिसीचा विचार झाला पाहिजे.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT