chandrakant patil reaction after eknath khadse joins ncp 
पुणे

'राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंना लिमलेटची गोळी देणार की, कॅडबरी?' 

सकाळ डिजिटल टीम

पुणे : खान्देशातील भाजपचे बडे नेते एकनाथ खडसे यांनी आज, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू होती. तेव्हापासूनच भाजपमधील नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करू लागले होते. यात, रावसाहेब दानवे यांचाही समावेश होता. आज, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'भाजपमध्ये अन्याय झाला असं खडसे म्हणतायत. त्यातून काही तरी मार्ग निघाला असता. पण, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांना काय देतात हे पाहूया. एकनाथ खडसे यांचा पक्ष प्रवेश दुपारी दोन वाजता होता. तो का लांबला? काय द्यायचं अजून ठरलं नाही? राष्ट्रवादीचे नेते 'समाधान होईल असं देऊ' एवढचं खडसेंना म्हणाले आहेत. आता समाधान ही वेगळी गोष्ट आहे. समाधान लिमलेटच्या गोळीमध्येही असतं. तेवढी गोळी देऊन, तुमचं समाधान झालं पाहिजे असंही म्हणता येते. आता राष्ट्रवादी त्यांना लिमलेट देतात की कॅडबरी हे पाहूया आणि खडसे समाधानी होतात की, आता काही पर्याय नाही, जे दिलंय त्यात समाधान मानून घेतात हे बघावं लागेल.'

दरम्यान, 40 वर्षे भाजपमध्ये काम केल्यानंतर आज, एकनाथ खडसे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या कार्यालयात निवडक समर्थकांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकून आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याचे सांगून, खडसे यांनी भाजपला धक्का दिला होता. आज त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षप्रवेशानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; युद्धस्थिती शमल्याचा परिणाम

Dhurandhar Movie Controversy: बॉक्स ऑफिसवर गाजणारा ‘धुरंधर’ आता कायद्याच्या रडारवर; बंदी घालण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : हरीश राणा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी 'ग्रीन पार्क स्मशानभूमीत आणले

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

India Sports Economy: भारतीय क्रीडा अर्थव्यवस्था २०० कोटी डॉलर पार; २०२५ वर्षामध्ये १३.४% वाढ; क्रिकेटचा वाटा सर्वाधिक ८९ टक्क्यांचा

SCROLL FOR NEXT