sanjay raut  
पुणे

''संजय राऊत यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठविणार''

अनिल सावळे -@AnilSawale

पुणे : ''शिवसेना नेते संजय राऊत यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार'' असं मला कळतंय, अशा मिस्कील शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना आज चिमटा काढला.

''पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचे माझ्या कानावर आले आहे. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असं म्हटलं असावं'', असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटील यांना लगावला होता. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पाटील यांनी हे वक्तव्य केले. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या सभागृहात आयोजित एका कार्यक्रमानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्यावेळी राऊत यांच्या विनोदी टीकेला, चंद्रकांत पाटील यांनीही विनोदी शैलीतच उत्तर दिलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या यांच्या मनात काय सुरू आहे हे समजण्याइतपत मी मनकवडा नाही. माहीत नाही ते का असं म्हणाले. मात्र राऊतांना कोणी फार गंभीरतेनं घेत नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

''मला माजी मंत्री म्हणू नका. पुढील दोन-तीन दिवसांत कळेल'', असे पाटील यांनी गुरुवारी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पाटील यांच्या विधानाबद्दल भाष्य करताना संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला होता. या विधानाबाबत विचारले असता पाटील म्हणाले, ''मी ते विधान करून केवळ एक दिवस उलटला आहे. अजून काही तास बाकी आहेत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT