vijaystambh sakal
पुणे

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल

पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. १) काही वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. १) काही वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

पिंपरी - पेरणे फाटा येथील विजयस्तंभ (vijaystambh) अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. १) काही वाहतूक मार्गात (Transport route change) बदल करण्यात आले आहेत .

मुंबई येथून नगरकडे जाणारी जड वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे नगरला जातील. तसेच याच मार्गावरील हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे नगरला जातील. आळंदी-शेल पिंपळगाव, बहुळ, साबळेवाडी या दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. तसेच आळंदी, मरकळ, लोणीकंदकडे जाणारी वाहतूकही बंद राहणार आहे.

यासह नाशिककडून येणारी मोठी वाहने ही शिक्रापूरकडे न जाता तळेगाव-चाकण चौकातून मोशी व तळवडेकडे जाऊ शकतील. देहूरोड येथे जुन्या मुंबई मार्गाने येणारी वाहने सेंट्रल चौकातून निगडीकडे न सोडता ही वाहने सेंट्रल चौकातून मुंबई -बेंगलोर महामार्गाने सरळ वाकड नाका, चांदणी चौकातून पुढे जातील. तसेच मुंबईकडून द्रुतगती मार्गाने पुणेकडे येणारी वाहने उर्से टोल नाका येथून मुंबई-बेंगलोर मार्गाने निगडी मुकाई चौकाकडे न जाता सरळ वाकड नाका व राधा चौक येथून पुण्याकडे जातील. मुंबईकडून द्रुतगती मार्गाने खिंडीतून तळेगाव कडे येणारी वाहने वडगाव फाट्याकडे न जाता उर्से टोल नाका येथून देहूरोडकडे जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याने जातील. नाशिक व तळेगावकडून येणारी वाहतूक तळेगाव, चाकण चौकातून शिक्रापूरकडे न जाता मोशी, नाशिकफाटा मार्गे पुण्याकडे जातील.

वाहतूक मार्गातील हा बदल शनिवारी मध्यरात्री बारापासून लागू होणार आहे. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.

केसनंद - येत्या १ जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या लाखो अनुयायांची गैरसोय होऊ नये, याकरिता पुणे- नगर रस्त्याने जाणारी वाहतूक जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

त्यानुसार, ३१ डिसेंबरला सायंकाळी पाच पासून ते एक जानेवारी २०२२ रोजी रात्री १२ पर्यंत वाहतुकीमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात येईल. यामध्ये शिक्रापूर ते चाकण सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. नगरच्या बाजूकडून पुणे, मुंबई बाजूकडे येणारी जड वाहने ही शिरूर, न्हावरे फाटा, न्हावरे, पारगाव, चौफुला, यवत, सोलापूर रोड यामार्गे पुण्याकडे येतील. तर पुण्याच्या बाजूकडून नगर बाजूकडे जाणारी जड वाहने ही पुणे- सोलापूर हमरस्त्याने, चौफुला, केडगाव मार्गे न्हावरे, शिरुर, नगर रस्ता अशी जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT