Chargesheet filed against eight persons fake certificate case pune crime police sakal
पुणे

Pune Crime : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी आठ जणांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल

आरोपींनी ३५ ते ८० हजार रुपये घेऊन असे प्रमाणपत्र दिल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बनावट गुणपत्रिका आणि अन्य कागदपत्रे देण्यासाठी बोगस ११ बोर्ड आणि विद्यापीठे स्थापून त्याद्वारे दोन हजार ७३९ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह आठ जणांविरोधात ३७० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आरोपींनी ३५ ते ८० हजार रुपये घेऊन असे प्रमाणपत्र दिल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम (वय ३८, रा. संभाजीनगर), संदीप ज्ञानदेव कांबळे (रा. दुधारी, सांगली), अफताब अब्दुल शेख (वय २९, मु. पो. कुंभेफळ, उस्मानाबाद), कृष्णा सोनाजी गिरी (वय ३९, रा. कृष्णापुर, बिडकीन, संभाजीनगर),

जमाल अजगर शेख (वय ३६, रा. पांजरपोळ, मुंबई), महेश ऊर्फ मुनीब दयाशंकर विश्वकर्मा (वय ३५, रा. चांदीवली, मुंबई), संदीपकुमार शमलाशंकर गुप्ता (वय ३३, रा. हनुमाननगर, कुर्ला) आणि जगदीश रमेश पाठक (वय ३३, रा. रायगड) अशी आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सय्यद इम्रान या मुख्य आरोपीने २०१९ ला ‘महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल (एमएसओएस) नावाने वेबसाइट सुरु केली. या ओपन स्कूलला फी आकारण्याचा किंवा परीक्षा घेण्याचा अधिकार नसताना, आरोपीने स्वयंसेवी संस्थाची मान्यता घेत परस्पर विद्यार्थ्यांना फी आकरण्यासोबत प्रमाणपत्र देण्याचे विद्यार्थ्यांना मान्य केले.

त्या आधारे त्याने अनेक विद्यार्थ्यांकडून ३५ हजार ते ८० हजारांपर्यंत रकमा स्वीकारल्या. तब्बल दोन हजार ७३९ विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, बीएससी, बीकॉम, बीए, डिप्लोमा आयटीआय, इंजिनिअरिंग, नर्सींगची प्रमाणपत्रे पैसे घेऊन वाटले असल्याचा ठपका आरोपींवर दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर, पोलिस नाईक गजानन सोलवनकर, पोलिस शिपाई राहुल होळकर यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र दाखल केले. यामध्ये सायबर तज्ज्ञ कपिल जैन यांनी तांत्रिक तपासासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली.

या विद्यापीठांच्या नावाने दिली प्रमाणपत्र

बनावट प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपींनी एजवाज विद्यापीठ, विद्यापीठ, अ‍ॅमडस विद्यापीठ, अ‍ॅमडस युनिव्हर्सिटी, एमबीटीईई बोर्ड, एमएसओएस (महाराष्ट्र स्टेट ऑफ ओपन स्कूल), महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल, एमआरएमव्ही (महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ), एएसओएस युनिव्हर्सिटी, बीएसईएम (बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन मराठवाडा) आणि बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन मराठवाडा अशी ऑनलाइन विद्यापीठे आणि बोर्ड स्थापन केली.

ज्या विद्यार्थ्यांनी आरोपींकडून प्रमाणपत्रे घेतली आहेत त्यांनी ती पुणे पोलिसांकडे त्वरित जमा करावी. बनावट प्रमाणपत्राच्या आधारे जे नोकरीस लागले आहेत, त्याची माहिती विविध संस्था आणि कंपन्यांनी कळवावी. प्रमाणपत्रे प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.

- नारायण शिरगांवकर, सहायक पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT