पुणे

खळबळजनक : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नगरसेवकाच्या हत्येची कारागृहात असलेल्या सराईत गुंडाला सुपारी

सकाळवृत्तसेवा

पुणे ः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहरातील एका ज्येष्ठ नगरसेवकाच्या हत्येची सुपारी येरवडा कारागृहातील गुंडाला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी नगरसेवकाने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुंड अनिल यशवंते व सुपारी देणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे बालेवाडी-पाषाण प्रभागातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक आहेत. 22 डिसेंबरला नगरसेवकाच्या मुलाला एका ओळखीच्या व्यक्तीने फोन करून भेटण्यासाठी बोलाविले. त्यावेळी "तुझ्या वडिलांच्या जिवाला धोका आहे. येरवडा कारागृहातील गुंड अनिल यशवंते याला तुझ्या वडिलांच्या हत्येची सुपारी देण्यात आली आहे, ' असे त्याने फिर्यादीच्या मुलाला सांगितले.

दरम्यान, त्याच रात्री फिर्यादी नगरसेवकाच्या बंगल्यासमोर समोर कारमधून आलेल्या काही जणांना पाळत ठेवली होती. नगरसेवकाच्या सुनेने बंगल्याचा दरवाजा बंद करताना असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून काही जणांना पाहिले होते. कारमधील एकाने शाल गुंडाळली होती. नगरसेवकाच्या सुनेने कोणाला भेटण्यास आला आहात, असे विचारल्यानंतर संशयित कारचालक व त्याचे साथीदार तेथून पसार झाले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

अनिल यशवंते हा नगर जिल्ह्यातील गुंड असून त्यास दरोड्याच्या गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे. सध्या तो येरवडा कारागृहात आहे. या प्रकरणासंबंधी यशवंते याची चतुःश्रृंगी पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्यामध्ये नगरसेवकाच्या हत्येची सुपारी देणारी व्यक्ती कोण आहे, यादृष्टीने तपास केला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी स्पष्ट केले. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT