मळद (ता. दौंड) - कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून याच तलावात सांडपाणी सोडले जात आहे.
मळद (ता. दौंड) - कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून याच तलावात सांडपाणी सोडले जात आहे. 
पुणे

रसायनमिश्रित सांडपाणी उजनी धरणात

सकाळ वृत्तसेवा

कुरकुंभ - मळद (ता. दौंड) येथील तलावात कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी रसायनमिश्रित सांडपाणी सोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून तलाव भरून वाहत असल्याने ओढ्याद्वारे हे रसायनमिश्रित सांडपाणी उजनी धरणात जात आहे. 

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे रसायनमिश्रित सांडपाणी ओढ्याद्वारे चार किलोमीटर अंतरावरील मळद तलावात जमा झाले आहे. हा तलाव तुडुंब भरून वाहू लागला की, हे रसायनमिश्रित सांडपाणी ओढ्याद्वारे मळद, रावणगाव, नंदादेवी, स्वामी चिंचोली येथील ओढ्याद्वारे भिगवण (ता. इंदापूर) येथील उजनी धरणाच्या पाण्यात मिसळते.

मळद येथील तलावातील पाण्याला उग्र वास, काळसर पाणी, पाण्यात पाय बुडवल्यास त्वचेला खाज सुटणे आदी त्रास सहन करावा लागतो आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत कंपन्यांकडून प्रक्रिया न करता सोडत असलेल्या रसायनमिश्रित सांडपाण्यासंदर्भात ठोस कारवाई व उपाययोजना न केल्यास हाच त्रास भविष्यात उजनी परिसरातील लोकांनाही होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे पांढरेवाडी, कुरकुंभ, मळद परिसरातील पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत. भविष्यात प्रदूषित पाणी वाहून जाणाऱ्या ओढ्यालगतच्या रावणगाव, नंदादेवी, खडकी, स्वामी चांदोली, भिगवण व धरण परिसरातील अनेक गावांचे पाणी स्रोत आणखी दूषित होण्याची शक्‍यता आहे. कुरकुंभ येथील कंपन्यांच्या घातक रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे जमिनीतील पाण्याचे स्रोत दूषित होण्याची व्याप्ती चार-पाच किलोमीटरपर्यंत होती. ती आता मळद तलावातून २३ किलोमीटरवरील भिगवण येथील उजनी धरणात मिसळत असल्याने भविष्यात दूषित पाण्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. उजनीतील मासे व इतर जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्‍यात येण्याची शक्‍यता निर्माण झाली. त्यामुळे सरकारने त्वरित ठोस पावले उचलून कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून होणारे जलप्रदूषण थांबवावे, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT