chemicals Thrown on two boys for banned smoking cigarettes 
पुणे

पुण्यात सिगारेट ओढण्यास मनाई केल्याने फेकले अॅसिडसदृश्‍य रसायन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोसायटीच्या आतमध्ये सिगारेट ओढण्यास आल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून दोघांवर गॅस शेगडी साफ करण्यासाठीचे अॅसिड सदृश्‍य रसायन फेकण्याची घटना उघडकीस आली आहे. रसायन चेहऱ्यावर पडल्याने दोघांचे चेहरे, छाती व ओठांवर दुखापत झाली. ही घटना बुधवारी पहाटे सव्वा दोन वाजता बाणेर फाटा येथे घडली.
पुणेकरांनो काळजी घ्या; पुण्यात आणखी पाच दिवस पाऊस 

याप्रकरणी बाणेर फाटा येथे राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणाने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी जवळपास राहण्यास आहेत. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख आहे. बुधवारी पहाटे फिर्यादी हे आरोपी राहात असलेल्या सोसायटीच्या आवारामध्ये सिगारेट ओढत होते. त्यावरुन आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन झटापट केली. त्यावेळी फिर्यादीचे मित्र त्यांच्यातील भांडणे सोडविण्यासाठी तेथे आले. त्यावेळी आरोपीने दोघांनाही शिवीगाळ केली.

मनसेच्या इंजिनला चावी मिळणार; पुण्यात असणार 'हे' उमेदवार 
याप्रकाराबाबत फिर्यादीने पोलिसांना खबर दिली, तेवढ्यात पोलिस तेथे आल्याने आरोपी तेथून निघून गेला. आरोपी हा गॅस एजन्सीमध्ये कामाला असल्याने त्याच्याकडे गॅस स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे अॅसिडसदृश्‍य रसायने होते. त्याने थोड्या वेळाने घटनास्थळी येऊन दोघांवर ते रसायन फेकले. रसायन दोघांच्या चेहऱ्यावर, छातीवर व ओठांवर पडल्याने दोघांनाही दुखापत झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : पुण्याजवळ पाबे घाटात ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT