Sinhgad-Fort 
पुणे

पुणे : शिवप्रेमींसाठी अनोखी पर्वणी; सिंहगडावर छबिना महोत्सवाचे आयोजन!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३९० वी जयंती बुधवारी (ता.१९) राज्यात उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानंतर आता राष्ट्रसेवा समूहाच्यावतीने सिंहगडावर येत्या सोमवारी (ता.24) छबिना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी दिवसभरात गडपूजन, छत्रपती राजाराम महाराज व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन, व्याख्यान, पोवाडा, पारितोषिक वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे राष्ट्रसेवा समूहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल पोकळे यांनी शुक्रवारी (ता.21) पत्रकार परिषदेत सांगितले.

पोकळे म्हणाले, ''मागील पंधरा वर्षांपासून संघटनेतर्फे शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्ताने छबिना महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानुसार यंदा येत्या सोमवारी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पूजनानंतर राजाराम महाराज यांच्या चारित्र्यावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर शिवशाहीर राजेंद्र खुडुसकर हे पोवाडा सादर करतील. या समारंभात नंदकिशोर मते यांना छत्रपती राजाराम महाराज गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१५ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग मेपर्यंत पूर्ण होणार, पण...; राज्य सरकारने दिली महत्त्वाची माहिती

T20 WC, IND vs WI: 'माझे ११ सैनिक सज्ज आहेत...' विंडीजच्या सॅमीची टीम इंडियाला सामन्यापूर्वी चेतावणी

Nashik Malti IVF Center : बदलापूर स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये! महापालिकेकडून 'मालती आयव्हीएफ'ला नोटीस

Latest Marathi News Update : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर शहरात वाहतूक कोंडी

Kolhapur : 'ड्यूटी'वरून एलसीबीचे दोन 'पाटील' भिडले, पोलिस अधीक्षक कार्यालयातच सुपारी देऊन संपविण्याची भाषा

SCROLL FOR NEXT