Pune Crime sakal media
पुणे

Pune Crime : विषारी औषध पाजून मुलाचा खून करणाऱ्या आईस जन्मठेप

पुतण्या निशिगंध अंथरुणात झोपलेला दिसला. तर त्यांची वहिनी स्वाती ही घरात बेशुद्ध पडलेली होती व पंख्याला साडी बांधलेले होती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कौटुंबिक वादाच्या कारणातून आपल्या तीन वर्षाच्या मुलाला विषारी औषध पाजून त्याचा खून करणाऱ्या आईला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी हा निकाल दिला. मुलाला विषारी औषध देवून आईने देखील ते औषध घेतले व गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला होता.

स्वाती विक्रम माळवदकर (वय २५, रा. तळवडे) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तळवडे येथे २ आॅगस्ट २०१६ रोजी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याबाबत स्वाती यांचे दीर श्रीकांत माळवदकर (वय ३०) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार स्वाती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या एक वर्ष आधी फिर्यादी व त्यांचा भाऊ विक्रम आणि आर्इ-वडील असे सर्व एकत्र राहत होते. मात्र स्वातीला ते मान्य नसल्याने तिचे सासू-सासरे गावी राहू लागले होते. परंतु सर्वांची एकत्र राहावे, अशी विक्रम यांची इच्छा होती. त्यामुळे विक्रम आणि स्वाती यांच्याच वाद झाले होते.

घटनेच्या दिवशी स्वाती हिने विक्रम यांचा फोन उचलला नाही. त्यामुळे विक्रम यांनी फिर्यादी यांना घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांना पुतण्या निशिगंध अंथरुणात झोपलेला दिसला. तर त्यांची वहिनी स्वाती ही घरात बेशुद्ध पडलेली होती व पंख्याला साडी बांधलेले होती. त्यामुळे फिर्यादी त्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी पुतण्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर स्वातीला काही दिवस उपचार केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिले. त्यांना ॲड. मनोज बिडकर यांनी मदत केली.

मी मुलाला बरोबर घेऊन जाणार आहे :

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी स्वातीने मुलाच्या खिशात एक सुसार्इट नोट लिहून ठेवली होती. आपले घर तुटण्यास मीच कारणीभूत आहे. आता मला सहन होत नाही. म्हणून मी मुलाला बरोबर घेऊन जाणार आहे, असे त्या चिठ्ठीत नमूद होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT