The children of sugarcane workers form junnar are also in the stream of online education 
पुणे

ऊसतोड कामगारांची मुलेही ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात

मीनाक्षी गुरव

पुणे  : "कोरोनामुळे हातातील काम बंद झाले, म्हणून आम्ही गावी परतलो. परंतु या सगळ्यात मुलांचे शिक्षण थांबू नये, म्हणून पोटाला चिमटा काढून चांगला मोबाईल (एंड्रॉइड) घेतला. मोबाईलमधील आम्हाला काही कळत नाही. परंतु त्यामुळे मुलांची शाळा मात्र सुरू झाल्याचा आनंद आहे," हे शब्द आहेत, इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या ओम या विद्यार्थ्याचे ऊसतोडीचे काम करणारे वडिल अमोल सकट यांचे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

इयत्ता तिसरीत शिकणारा ओम सध्या नगरच्या जामखेड तालुक्यातील पाडळे या त्याच्या मूळगावी राहत आहे. खरतर ओमची शाळा पुण्यातील जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी येथे आहे. पण कोरोनामुळे हातातील काम गेल्याने त्याच्याही कुटुंबाला इतरांप्रमाणे गावचा रस्ता धरावा लागला. गेल्या सात-आठ वर्षापासून कामाच्या शोधात सकट कुटुंबिय नगरहुन ठिकेकरवाडीत पोचले. त्यांच्या कुटुंबातील ओम आणि आर्यन ही मुले ठिकेकरवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. परंतु मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु आहे. आता ऑनलाइन शिक्षणाच्या पुढील टप्पा शाळेमार्फत सुरू केला आहे. यात शाळेतील मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ग्रामपंचायत आणि पालकांनी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध केला  आहे. त्यातून २० टॅब उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे आता शाळेतील ओम, आर्यन सारख्या मुलांना घर बसल्या 'टॅब'द्वारे शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ओम आणि आर्यन प्रमाणेच बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत टॅब पोचविण्यासाठी त्यांच्या पालकांना शाळेत बोलविण्यात आले होते.

धक्कादायक : पुण्यात वडगाव ब्रिजला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

शाळेचे मुख्याध्यापक संतोष गडगे म्हणाले,"या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून एक लाख रुपये आणि उर्वरित रक्कम ग्रामस्थ आणि ग्रामस्थांच्या यात्रा वर्गणी फंडातून जमा करण्यात आली. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्यात आली. शाळेतील तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी टॅब देण्यात आला. याद्वारे अध्ययन प्रभावी होण्यासाठी फायदा होणार आहे. सध्या शिक्षक झूम मिटींग अॅपद्वारे मुलांना शिकवित आहेत. यामध्ये आपल्या मूळगावी गेलेले विद्यार्थी देखील गावातून शिक्षण घेत आहेत. 'टॅब'मुळे अधिक प्रभावीपणे अभ्यास करणे शक्य होणार आहे." 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT