Citizen Dispute with the Pune police due to closed road in Peth 
पुणे

...असं काय झालं ज्यामुळे पुणेकर पोलिसांसोबत भिडले!

सकाळवृत्तसेवा

पुणे : रुग्ण संख्या जास्त असल्याने प्रतिबंधित क्षेत्रातील बंद करण्यात आलेल्या रस्त्यांवरून आता पोलिस आणि स्थानिक नागरिक असा संघर्ष सुरू झाला आहे. बंद केलेले रस्ते खुले करून त्यावरून जाऊ द्यावे, अशी मागणी केल्याने नागरिक आणि पोलिसांमध्ये आज दुपारी कसबा पेठेत खडाजंगी झाली.

पुण्याच्या इतिहासातील 'ती' काळी तारीख...ढगफुटी...आंबिल ओढा..अन्...  

शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे  लॉकडाऊनच्या काळात 'या' भागातील नागरिकांनी घराबाहेर पडून गर्दी करू नये, यासाठी अंतर्गत रस्ते ठिकठिकाणी बॅरिकेडस, बांबू आणि पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत. लॉकडाउनच्या काही अटी शिथिल करण्यात आल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात दुकाने तसेच कार्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे आता प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकही घराबाहेर पडत आहेत. मात्र ते राहत असलेल्या परिसरातील रस्ते अद्याप बंद असल्याने नोकरी तसेच इतर महत्वाच्या कामानिमित्त वाहन घेवून बाहेर पडण्यात त्यांना अडथळे येत आहे.

पुणे- मुळशी प्रवास करताय? सावधान..

आज दुपारी कसबा पेठेतून शिवाजी रस्त्यावर येणारा गल्लीतील बंद केलेला रस्ता खुला करावा, यासाठी वाहनचालक आणि पोलिसांमध्ये किरकोळ वाद झाले. यावेळी काही नागरिकांनी बांबु काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना विरोध केला. यावेळी दुचाकीवर असलेले   वाहनचालक बंद केलेल्या रस्त्यावरून आम्हाला शिवाजी रस्त्यावर येवू द्या, तसेच शिवाजी रस्त्यावरून कसबा पेठ भागात जावू द्यावे या मागणीसाठी अडून बसले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना वाहतुकीस परवानगी नाही, असे कारण देत तेथून जाण्यास सांगितले. पेठांतगर्त रस्ते अडीच महिन्यांपासून वाहतुकीस बंद आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना शहराच्या पूर्व भागात पुणे स्टेशन, ससून हॉस्पिटल, नाना पेठ, कॅम्प आदी भागात जाण्यात अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या परिसरातील रस्ते खुले करण्याची मागणी होत आहे.

मोटार विहिरीत कोसळून महिलेसह दोन बालकांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिकेत पदोन्नतीवरून प्रशासनावर दुजाभावाचा आरोप, आयुक्तांचा खुलासा

Valentine Day 2026: 'व्हॅलेंटाईन डे' फक्त प्रियकर-प्रेयसीसाठी नव्हे, तर कुटुंब अन् मित्रांवरही प्रेम व्यक्त करण्याचा सण!

Valentine Day 2026 Special Recipe: व्हॅलेंटाईन डे ला सकाळी नाश्त्यात पार्टनरसाठी बनवा 'हार्ट शेप सँडविच', नोट करा रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi - कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ ते २० फेब्रुवारी २०२६ - मराठी राशी भविष्य

Marriage Counseling : भावनिक संघर्ष आणि सावरण्याचा मार्ग

SCROLL FOR NEXT