wagholi.jpg 
पुणे

....म्हणून 'पीएमआरडीए'च्या कार्यालयासमोर नागरिकांनी केले आंदोलन

सकाळवृत्तसेवा

वाघोली (पुणे)  : वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाची वर्क ऑर्डर देऊन नऊ महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप कामाला सुरुवात न झाल्याने आज नागरिकांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयासमोर सामाजिक अंतर ठेवत आंदोलन केले. वाघोलीची लोकसंख्या सुमारे दोन लाखापेक्षा अधिक आहे. यामुळे सध्याची पाणी पुरवठा योजना अपुरी पडते.

या योजनेतून सोसाट्यांना पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे त्यांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. त्यासाठी मोठा खर्च होतो. वाढीव पाणी पुरवठा योजना करावी अशी मागणी नागरिक दोन, तीन वर्षापासून करीत होते. यानंतर पीएमआरडीएने 22 कोटी रुपये खर्चाची वाढीव पाणी पुरवठा योजना आखली. सगळ्या प्रक्रियेनंतर नऊ महिन्यांपूर्वी ठेकेदाराला वर्क ऑर्डरही देण्यात आली. मात्र, अद्याप कामच सुरू न झाल्याने प्रॉब्लेम सॉल्वर समितीचे सदस्य, नागरिक व ग्रामपंचायत समस्त यांनी औंध येथील प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर सामाजिक अंतर राखत निषेध आंदोलन केले.

यानंतर आयुक्त विक्रमकुमार यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. पाणी योजनेचे काम सुरू करण्याबरोबरच कचरा व डीपी रोडचा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले. वाघोलीतील सर्व सोसायट्या पाणी विकत घेतात. यावर त्यांचे हजारो रुपये खर्च होतात. टँकर चालक मनमानी दर आकारतात. वाढीव पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यास सर्वांना पाणी मिळेल. यामुळे नागरिकांच्या खर्चातही बचत होईल. आम्ही प्राधान्याने कर भरतो. मात्र आम्हालाच सुविधांपासून वंचित रहावे लागते. अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT