Pune-Zp 
पुणे

दुर्गम भागातील नागरिकांनो, 'पुणे झेडपी'च्या योजनांसाठी भरा 'ऑफलाइन' अर्ज!

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगरी भागातील व्यक्तींकडून व्यक्तिगत लाभाच्या योजनांसाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय गावां-गावातील "आपले सरकार' या कक्षात हे अर्ज मोफत भरून देण्यात येणार आहेत. व्यक्तिगत लाभाच्या सर्व योजनांसाठी अर्ज करण्यास येत्या 16 ऑक्‍टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी बुधवारी (ता.7) सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषदेच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठीचे यंदा पहिलेच वर्षे आहे. यासाठी महालाभार्थी हे वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. हे वेबपोर्टल नवीन असल्याने, त्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहेत. परंतु, त्यासाठी ऑफलाइनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवाय यातील यातील अडचणी जसजशा लक्षात येतील, तशा त्यात सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यानुसार दुर्गम भागात इंटरनेट जोडणीचा अभाव, रेंज नसणे या अडचणी गृहीत धरत, तेथे ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याचा आदेश दिलेला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवतरे म्हणाले, 'जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या योजनांसाठी आतापर्यंत एका व्यक्तीला दोन लाभ देण्यात येत असत. मात्र आता ऑनलाइन अर्ज स्वीकारल्याने लाभार्थ्यांची मोठी संख्या वाढणार आहे. यासाठी यापुढे एका व्यक्तीला दोन लाभ देण्याऐवजी एका कुटुंबात दोन लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अर्जांची संख्या वाढली तरी लाभ मिळणाऱ्या कुटुंबांचीही संख्या वाढणार आहे.''

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iranian Oil Tanker: होर्मुझ ओलांडल्यानंतर समुद्रात मोठा खेळ; भारताकडे निघालेल्या इराणी जहाजाचा यू-टर्न, चीनला जात आहे तेल

IAS transfer news : कोल्हापूर जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांची बदली; एकाच दिवशी धडाधड बदल्यांच्या आदेशाने चर्चांना उधाण

Konkan Mango Farmers : कोकणच्या हापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी! राजू शेट्टींच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय, वाशी APMC मधील बैठकीत काय ठरलं?

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेतील हजार कोटींच्या टेंडर्सवर मोठा निर्णय

Gas Cylinder Line : भर उन्हात नागरिकांच्या सिलिंडरसाठी रांगा; तुटवड्यामुळे ग्राहकांचे हाल, तब्बल ४६०० ग्राहकांची नोंदणी

SCROLL FOR NEXT