पुणे

आधी लस नव्हती, आता माणसं नाहीत; नियमामुळे नियोजन फसले

​ ब्रिजमोहन पाटील

- लसीकरण केंद्रावर जबरदस्तीचा शुकशुकाट

- ८४ दिवस न झाल्याने नागरिक माघारी

- काही ठिकाणी वाद तर काही ठिकाणी विनंती

पुणे : लस मिळणार म्हणून भल्या सकाळपासून नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली. पण ज्यांनी ८४ दिवसांपूर्वी म्हणजेच २३ फेब्रुवारीपूर्वी कोव्हिशील्डचा पहिला डोस घेतला आहे, अशाच नागरिकांना दुसरा डोस मिळेल असे लसीकरण केंद्रांवरून वारंवार सांगण्यात आले. काहींना ४० दिवस, काहींना ५० दिवस तर काहींना ६० दिवस झाले होते. पण ८४ दिवसाचा नियम असल्याने या नागरिकांना माघारी फिरावे लागले. त्यामुळे इतर वेळी २००-३०० लोकांच्या गर्दीने भरलेल्या लसीकरण केंद्र आज सकाळी १० वाजताच शुकशुकाट झाला होता. ही स्थिती आहे धायरीतील लायगुडे रुग्णालयातील अशीच स्थिती कमी जास्त प्रमाणात शहरातील इतर केंद्रांवर होती.(Citizens returned from the center despite the vaccine cause PMC planning failed)

''शासनाकडून महापालिकेला साडे सात हजार कोव्हिशील्डचे डोस मिळाल्याने बुधवारी लसीकरण सुरू झाले. केंद्र शासनाने कोव्हिशील्डचा दुसरा डोस १२ ते १६ आठवड्याच्या (८४ ते ११२ दिवस) दरम्यान द्यावा'' असे सांगितले आहे. त्यानुसार महापालिकेने मंगळवारी आदेश काढले होते.

बुधवारी सकाळी सहा-सात वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी जमण्यास सुरवात झाली. तेथे नियुक्त असलेल्या सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी ४५ वयाच्या पुढील नागरिकांचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले असेल तरच त्यांना दुसरा डोस मिळेल, त्यापेक्षा कमी दिवस असतील तर त्यांनी येथून निघून जावे. तसेच पहिल्या डोससाठी ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, त्यांच्यासाठी केवळ १० टक्के लस आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे किमान दोन तास लाईनमध्ये थांबून राहिलेल्या नागरिकांना लस न घेताच घरी जावे लागले.

लसीकरण केंद्रांवरील गर्दी ओसरल्याने ८४ दिवस पूर्ण केलेले केवळ ५ ते १० आणि पहिल्या डोससाठी नोंदणी केलेले ४-५ नागरिक असे १० ते १५ नागरिकांनी सकाळच्या वेळेत लस घेतली. लायगुडे दवाखान्यात सकाळी सुमारे ९ जणांनी तर दत्तवाडीतील गाडगीळ दवाखान्यात ऑनलाइन नोंदणी केलेल्या पाच जणांनाच सकाळी साडेअकरापर्यंत लस देण्यात आली होती. तसेच आरोग्य सेवा व फ्रंट लाइन कर्मचारी यांनीही दिवसभरात येऊन दुसरा डोस घेतला. इतर केंद्रावर हीच स्थिती होती.

राजीव गांधी रुग्णालयात वाद

येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात लसीकरणाच्या ८४ दिवसाच्या नियमावरून तेथील कर्मचारी व नागरिकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. लसीकरण केंद्रावर लस असून देखील आम्हाला का दिली जात नाही असा जाब नागरिकांनी विचारला. त्यावेळी त्यांना महापालिकेचे आदेश दाखविला तरीही नागरिकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे काही काळ केंद्रावर तणाव होता.

‘‘कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेऊन ६० दिवस झाले आहेत, तरीही लस मिळाली नाही. ८४ दिवसांचा नियम खूपच जाचक आहे, यात बदल झाला पाहिजे लायगुडे केंद्रावर १०० डोस आहेत, पण लस घेणारे १० जण सुद्धा नाहीत तरीही आम्हाला लस मिळत नाही. त्यामुळे हे नियम संताप आणणारे आहेत.’’

-प्रकाश पाटील, ज्येष्ठ नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT