light.jpg 
पुणे

पिंपरी : ऐन उकडा अन् त्यात आता...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : लॉकडाउनमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पिंपरीगावाचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. ऐन उन्हाळ्यात सकाळी, दुपारी आणि कधी कधी रात्रीची वीज गायब होत असल्याने नागरीक हैराण झाले आहेत.

सध्या मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. रात्रीच्यावेळी वीज गेल्यावर डासांचा त्रास सुरु होतो. त्याचा नागरीकांच्या झोपेवर अप्रत्यक्षपणे परिणाम होत आहे. पिंपरीगावात मोठ्या प्रमाणात बैठे घर, चाळी आहेत. लॉकडाउन असल्यामुळे त्यांना धड बाहेरही पडता येत नाही. त्यांना अंगणातही झोपतादेखील येत नाही. एकदा वीज गेल्यावर तासन्‌तास पुर्ववत होत नाही. त्यात कहर म्हणजे, नागरीकांनी तक्रार केल्यावर त्याची दखल घेतली जात नाही. ग्राहकांचे फोन उचलले जात नसल्याने लोकांच्या त्रासात अधिक भर पडत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पिंपरीगावातील महावितरणच्या कार्यालयात सध्या एकही अधिकारी किंवा कर्मचारी येत नाहीत. त्यामुळे नागरीकांच्या तक्रारीकडे टेक्‍निशियन दुर्लक्ष करत धुडकावून लावत असल्याची तक्रार स्थानिक नागरीक श्रीरंग शिंदे यांनी केली आहे. ते म्हणाले, "" गेल्या 15 दिवसांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर, उपकार्यकारी अभियंता भुजंग बाबर यांना फोनद्वारे सातत्याने तक्रार केली आहे, पण त्यांनी गांभिर्याने घेतले नाही. ग्राहकांच्या तक्रार सोडविण्यात येत नसल्याने नागरीक वैतागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike : दूध महागणार! १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ; नवा दर किती?

Devdutta Padikkal Tattoo: बाबो! जर्सीचा नंबर अन् नाव थेट पाठीवर! पडिक्कलच्या टॅटू पाहून चाहतेही चक्रावले, म्हणाले, ‘ अरे हे काय!’

Animal Feed Poisoning: पशुखाद्यातून विषबाधा; गोणेवाडीत दोन जनावरे दगावली, दोन गंभीर; पशुपालकाला मोठा आर्थिक फटका

Marathi News Live Updates : रक्षाबंधनानिमित्त रामदास आठवलेंची कामाठीपुराला भेट; महिलांनी बांधली राखी

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात माणुसकीला लाज आणणारी घटना! मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने चोरले; VIDEO VIRAL होताच संतापाची लाट

SCROLL FOR NEXT