पुणे

पुण्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला;गेल्या चार महिन्यांत सर्वांत कमी दर

योगिराज प्रभुणे

पुणे - तुम्हाला तुमच्या आसपास कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झालेली जाणवतेय ना? गेल्या चार महिन्यांपूर्वी आपल्या घराच्या, सोसायटीच्या आसपास एकामागून एक कोरोना रुग्णांचे निदान होत होते. ही परिस्थिती आता दिसत नाही, हे तुमच्याही लक्षात आले असेल ? नेमका हाच शास्त्रीय निष्कर्ष पुणे महापालिकेचाही आहे. शहरात गेल्या चार महिन्यांमधील कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा सर्वांत कमी दर सध्या नोंदला जातोय. अर्थातच, याचे सर्व श्रेय पुणेकरांचे! 

राज्यातील कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण 9 मार्चला पुण्यात आढळल्यानंतर वेगाने संसर्ग वाढत गेला. पुण्यात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक मोठा उद्रेक झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. पुण्यात 11 ते 17 सप्टेंबर या आठवड्यात कोरोनाची चाचणी केलेल्या प्रत्येक शंभरपैकी 30 जणांचा कोरोनाचे निदान झाले होते. त्यानंतर मात्र, कोरोनाच्या रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी होत गेली. त्या वेळी एकेका दिवसांतील कोरोना संसर्गाचे प्रमाण 32 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले होते. ते आता सर्वांत कमी आहे. पुण्यात 4 जानेवारीला गेल्या दहा महिन्यांमधील सर्वांत कमी संसर्गाचा दर म्हणजे 4. 6 टक्के होता. त्या दिवशी पुण्यात दोन हजार 901 कोरोनाच्या तपासण्या झाल्या. त्यापैकी फक्त 135 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या आधारावर हा निष्कर्ष पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने काढला आहे. 

कमी होण्याची प्रमुख कारणे 
- मास्क, सॅनिटाझरचा वापर - पुणेकरांनी गेल्या दहा महिन्यांमध्ये प्रत्येक दिवशी वेळोवेळी हात निर्जंतुक करण्याची सवय स्वत-ला लावून घेतली. हॅंड ग्लोअज वापरायला सुरवात केली. कोठेही गेल्यानंतर तळ हाताला सॅनिटाझर लावायचे, हे आता आपल्या अंगवळणी पडले आहे. तसेच, घराबाहेर पडताना मास्कचा वापर होतो. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण नियंत्रित करण्यात प्रशासनाला यश आले. 

- गर्दीची ठिकाणे टाळणे - गणपती, दिवाळी अशी अपवादात्मक गर्दी वगळता बहुतांश गजबजलेल्या ठिकाणी जाण्याचे लोकांनी टाळले. 

- तातडीने केलेल्या चाचण्या - सर्दी, ताप, खोकला अशी सामान्य लक्षणे दिसताच वेळ न घालवता बहुतांश पुणेकरांनी तातडीने कोरोना चाचणी केली. महापालिकेचे स्वॅब सेंटर, रुग्णवाहिका या ठिकाणी जाऊन रुग्णांनी या चाचण्या केल्या. सप्टेंबरमध्ये एकेका स्वॅब सेंटरवर 200 रुग्ण रांगेत असायचे. ते प्रमाण आता 30-40 पर्यंत कमी आले आहे. 

- लवकर निदान आणि प्रभावी उपचार - कोरोना संसर्गाचे लवकर निदान आणि त्यावर केलेले प्रभावी उपचार हे सूत्र प्रशासनाने ठेवले. मधुमेह, हृदयविकारासारख्या इतर आजाराच्या रुग्णांमध्ये कोरोनामुळे उपचारात गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. या पार्श्‍वभूमीवर पुण्यात तातडीने प्रभावी उपचारास डॉक्‍टरांनी प्राधान्य दिले. त्यात रेमडेसिव्हिर हे इंजेक्‍शन प्रभावी ठरले. 

- पायाभूत सुविधा वाढविल्या - प्रत्येक रुग्णाला त्याच्या गरजेप्रमाणे उपचारांसाठी बेड उपलब्ध होईल, अशी पायाभूत सुविधा निर्माण केली. 

पुण्यात गेल्या 29 डिसेंबरला कोरोनाच्या संसर्गाचा दर 10 टक्के होता. नवीन वर्षांमध्ये संसर्गाचा दर 4.6 टक्‍क्‍यांपर्यंत कमी आला आहे. हा आतापर्यंतचा सर्वांत कमी संसर्गाचा दर आहे. 
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT