Supriya Sule 
पुणे

'सारथी' संस्थेत सुळे-परिहार वादाची चर्चा, पण घडले नक्की काय वाचा...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेबाबत (सारथी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी दर्शविली, तर संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार यांनीही त्यांच्यापुढे व्यथा मांडल्या. सरकारने संस्थेची स्वायत्तता काढून घेतल्याने काम करणे कठीण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांनी भेटीनंतर म्हटले होते, की राज्य सरकारकडे पाठपुरावा करू. यासंबंधी जारी करण्यात आलेल्या आदेशामुळे तरुण विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत, यासंबंधी राज्याच्या मुख्य सचिवांबरोबर चर्चा करू. 'सारथी'वर निर्बंध लादल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी बुधवारी 'सारथी'ला भेट दिली होती. तेथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि या संस्थेच्या कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यांचे प्रश्‍नही त्यांनी समजून घेतले. 

उद्धव ठाकरेंचा संभाजीराजेंना फोन; पत्राची घेतली तात्काळ दखल

त्यांच्या भेटीवेळी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी फोटो व व्हिडिओ करण्यास सुरवात केल्याने सुप्रिया सुळे नाराज झाल्या. त्यांनी व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. यावेळी संस्थेच्या कामकाजावरून सुळे व परिहार यांच्यात वादावादी झाल्याचेही समजते. विद्यार्थ्यांनी त्यांना 'सारथी' वाचविण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी केले आहे. 

राष्ट्रवादीकडून 'या' दोन नेत्यांना विधानपरिषदेचे गिफ्ट

सारथीच्या माध्यमातून मराठा आणि कुणबी समाजाच्या तरुणांना आशेचा किरण दिसला आहे. या माध्यमातून अनेक योजना तरुणांसाठी राबविल्या जात आहेत. पण निर्बंध लादल्याने 'सारथी'मार्फत मिळणारी पाठ्यवृत्ती बंद होण्याचा धोका असल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर या प्रकरणी सचिवांची बैठक घेऊन या प्रश्‍नी मार्ग काढण्याची ग्वाही सुळे यांनी दिली.

सुप्रिया सुळेंमुळे परिहार यांचा राजीनाम्याची अफवा
सुप्रिया सुळे यांच्या भेटीदरम्यान झालेल्या वादामुळे सारथीचे व्यवस्थापकिय संचालक डी. आर. परिहार यांनी राजीनामा दिल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. पण, परिहार यांनी 11 डिसेंबरला आपला राजीनामा मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे दिला आहे. सारथी संस्थेची स्वायत्तता 3 डिसेंबरला एक परिपत्रक काढून मागे घेण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT