पुणे

स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राडा; भाजप-राष्ट्रवादी आमने सामने

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात सोमवारी जोरदार राडा झाला. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी काही महिला कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचंही व्हिडिओमधून समोर आलं आहे. (clash out in Smriti Irani program at BalGandharv RangMandir Pune BJP NCP workers aggressive)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या आहेत. इराणी यांची सकाळीच पुण्यात आगमन झालं. त्यांच्या या दौऱ्याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच निषेध केला आहे. महागाईच्या मुद्द्यावर त्यांनी बोलावं अशी मागणी करत सकाळी हॉटेल जे डब्ल्यू मॅरिएट इथं माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत, फलक हातात घेऊन त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तर बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान, प्रत्यक्ष कार्यक्रम सुरु झाला तेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिरात आधीच बसले होते. त्यानंतर स्मृती इराणी बोलायल्या उठल्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नलावडे यांच्यावर भाजपच्या एका कार्यकर्त्यांनं त्यांच्यावर हात उगारला. यानंतर पोलिसांनी सर्वांना आवरण्याचा प्रयत्न केला. पण यामुळं चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.

भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आमच्यावर हल्ला - वैशाली नागवडे

"मेरिएट हॉटेलला आम्हाला स्मृती इराणींना भेटू दिलं नाही, त्यामुळं आम्ही बालगंधर्व रंगमंदिरात शेवटच्या लाईनमध्ये जाऊन बसलो. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अचानक घोषणाबाजी सुरु केली त्यानंतर आम्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणा दिल्या. यानंतर भाजपतील पुरुष कार्यकर्ते तिथं आले आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला. पोलीस तिथं असतानाही त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जुमानलं नाही," अशी माहिती मारहाण झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Airport : दिल्ली विमानतळावर ATCमध्ये मोठा बिघाड, ९०० विमानांना विलंब तर २० उड्डाणे रद्द; ३६ तासांनतर काय आहे परिस्थिती?

Shirol election: महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट रिंगणात; दत्तवाड मतदारसंघात बंडखोरीची चिन्हे!

Pune : अपघातानंतर डोकं BRT स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं, धक्कादायक VIDEO VIRAL

Kolhapur Road Work : कोल्हापुरातील रस्त्यांची कामे खराब केल्याने चार अभियंत्यांची वेतनवाढ रोखली, आयुक्तांच धाडसी पाऊल

IND vs SA Test: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! उपकर्णधार रिषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जखमी; पाहा Video

SCROLL FOR NEXT