Crime_Bribe 
पुणे

सासवड : लाच घेणारा लिपिक अडकला 'एसीबी'च्या जाळ्यात; सातबाऱ्यासाठी मागितले सहा हजार रुपये!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा काढून देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारणारा सासवडच्या भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. त्याच्याविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महम्मद रफिभाई गनीभाई मुलाणी (वय 55) असे लाच स्वीकारणाऱ्या लिपिकाचे नाव आहे. लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुलाणी हा सासवड येथील भूमी अभिलेख कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. दरम्यान त्याच्याकडे तक्रारदाराने जमिनीचा सातबारा आणि फेरफार उताऱ्यांच्या नकला मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, मुलाणी याने या कामासाठी तक्रारदाराकडे सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, विभागाने त्याच्या तक्रारीची पडताळणी केली, त्यावेळी मुलाणी याने तक्रारदाराकडे लाच मागितल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखालील सोमवारी (ता.१२) पथकाने सापळा रचून मुलाणीला सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिरा भाईंदर जैनांची नगरी, भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद; उलटे-सुलटे धंदे बंद करण्याचा मनसेचा इशारा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांचा 'अकरा प्लस'चा डाव, अध्यक्षपदासाठी चुलत भावाचंही नाव; आमदार पडळकरांचा गंभीर आरोप

Bajrang Sonawane : 'विलास घुले प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्याचा वाल्मिक कराडचा डाव', बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप; कथित कॉल रेकॉर्डिंग ऐकवली

Mumbai Weather: मुंबईकरांनो सावधान! पुढचे ७२ तास घराबाहेर पडताना काळजी घ्या; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे ठाण्यात प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT