bhor 
पुणे

पुणेकर पर्यटकांसाठी यंदा भोर- वेल्ह्याचा पाऊस...  

विजय जाधव

भोर (पुणे) : भोर उपविभागातील भोर व वेल्हे तालु्क्यातील सर्व पर्यटनस्थळे, धरणे व किल्यांवर पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. भोरच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे इंन्सीडंट कमांडर तथा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी गुरुवारी (ता.१८) याबाबतचे आदेश जारी केले. 

भोर व वेल्हे तालुक्यातील धरणे, पर्यटनस्थळे, गड-किल्ले, धार्मिकस्थळांवर पावसाळ्यात खूप गर्दी होते. यामध्ये भोर तालुक्यातील भाटघर व नीरा- देवघर धरण, रायरेश्वर व रोहिडेश्वर (विचित्रगड) किल्ला, नेकलेस पॉइंट, वरंधा घाट व मांढरदेवीचा अंबाड खिंड घाट, बनेश्वर, भोरेश्वर व नागेश्वर मंदीर वेल्हे तालुक्यातील तोरणा व राजगड किल्ला, गुंजवणी-चापेट धरण आणि मढेघाट धबधबा आदी ठिकाणांचा समावेश आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या ठिकाणी पावसाळ्यात अनेक वेळा अपघात होत असून, तरुणांकडून मद्यपान व हुल्लडबाजीही होत असते. त्यामुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आता तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यास अधिक महत्व आले आहे.

पुण्यातील न-हे- आंबेगाव येथे राहणारा कोरोनाग्रस्त तरुण पर्यटनासाठी तोरणा किल्यावर गेल्याची माहिती प्रशासनास मिळाली आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनामुळे अपघातांबरोबर कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पावसाळ्यात वरील सर्व ठिकाणांवर पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भारतीय दंडसंहिता कायद्याअंतर्गत पोलिसांमार्फत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

America Car Culture : अमेरिकेत मर्सिडीज-बीएमडब्ल्यू पाहून श्रीमंत समजू नका! भारतीय तरुणाने सांगितलं धक्कादायक वास्तव, पाहा VIRAL VIDEO

Dusseldorf Ganeshotsav : ड्युसेलडॉर्फमध्ये गणरायाची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात रंगला मराठमोळा उत्सव

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

SCROLL FOR NEXT