CM eknath shinde  esakal
पुणे

मला राज्यात शांतता हवीय; सामंतांच्या हल्ल्यानंतर CM शिंदेंची प्रतिक्रिया

गुन्हा झाल्यावर पोलिसांना कारवाई करा, असं सांगावं लागत नाही, असंही शिंदे म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे दोघेही दौऱ्यावर होते. यावेळी काही शिवसैनिकांनी गद्दार गद्दार म्हणत शिंदे गटातल्या उदय सामंत यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे. यावरुनच आता मुख्यमंत्री शिंदेंनी सुनावलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून ही मर्दुमकी नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "उदय सामंत यांच्यावर भ्याड हल्ला झाला आहे. ही मर्दुमकी नाही. कोणी कायदा,सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असेल, तर पोलीस कारवाई करतायत. कोणी आतातायी पणा केली, तरी पोलीस कारवाई करतील. गुन्हा झाल्यावर पोलिसांना सांगावं लागत नाही की गुन्हा दाखल करा. जे कोणी चिथावणी खोर भाषण करत असेल तर पोलीस कारवाई करतील. कायदा सुव्यवस्था पोलीस पाहतील,प्रक्षोभित भाषण कोणी करत असेल तर पोलीस कारवाई करतील. मला राज्यात शांतता हवी आहे".

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात मंगळवारी हल्ला झाल्याची घटना घडली होती. कात्रज परिसरात हा हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणात पोलिसांनी कारवाई करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या 'शिवसंवाद' सभेच्या आयोजकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT