cm uddhav and deputy cm ajit pawar will visit serum institute 
पुणे

Serum Institute Fire: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेली आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत तेथील कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित आहे. तसेच, या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

उपमुख्यमंत्री पवार हे गुरुवारी (ता.२१) सायंकाळी साडेसात वाजता सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने याबाबत पत्रक जारी करण्यात आले आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेली आग आटोक्‍यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग आटोक्‍यात आणण्यासाठी आणि मदत कार्यात सहभागी आहेत.

पुण्याच्या विभागीाय आयुक्तांकडून याबाबत माहिती घेतली असून, दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग आटोक्‍यात आणून दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असे पवार यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री शुक्रवारी घटनास्थळी भेट देणार 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगीच्या दुर्घटनेबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केली आहे. शुक्रवारी (ता. 22) दुपारी साडेतीन वाजता पुणे येथे सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Lord's ODI: इंग्लंडला RO-KO नडले, पण अखेर भारतीय संघाचा प्रयत्न तोकडे पडले! यजमानांनी विजयासह मालिकाही जिंकली

IND vs ENG: रोहित शर्माच्या शतकात LORD शार्दुल ठाकूरचं मोठं योगदान, पण कसं? जाणून घ्या नेमकं गुपित

ENG vs IND: Rohit Sharma चा लॉर्ड्सवर 'हिटमॅन' अवतार; शतक ठोकत इतिहास घडवला, गिलसोबतही केली विक्रमी भागीदारी

Parliament March Row: परवानगी मागितली नाही, दिलीही नाही; कलम १६३ लागू, संसद मार्चला दिल्ली पोलिसांचा स्पष्ट नकार

FIFA World Cup Final चा फिव्हर भारतातही! तीन राज्यातील शाळांना थेट सरकारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT