Pune : सीएनजी पुन्हा दोन रुपयांनी महागला
Pune : सीएनजी पुन्हा दोन रुपयांनी महागला sakal media
पुणे

Pune : सीएनजी पुन्हा दोन रुपयांनी महागला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पेट्रोलच्या वाढत्या किमतीला कंटाळून सीएनजीचा पर्याय स्वीकारलेल्या आणि आधीपासून सीएनजीचा वापर करीत असलेल्या अनेक वाहनधारकांना आता आणखी एक आर्थिक झटका बसला आहे. आजपासून सीएनजी एक रुपये 80 पैशांनी महागले आहे. त्यामुळे आता शहरात एक किलो सीएनजीसाठी 63.90 रुपये मोजावे लागणार आहे.

गेल्या महिन्यात दोनदा दरवाढ होऊन सीएनजी प्रतिकिलो ४.०६ रुपयांनी महागले होते. चार आणि १४ आॅक्टोंबर रोजी अनुक्रमे दोन आणि २.६ रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली होती. एकदाच महिन्यात दोन वेळा चार रुपयांनी दरवाढ झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यानंतर आज सीएनजी 1.80 रुपयांनी महागले. मार्च 2020 पूर्वी तीन ते चार महिन्यांतून एकदा सीएनजीच्या दरात वाढ होत. ही वाढ जास्तीत जास्त एक रुपयांपर्यंत असायची. मात्र आता दर महिन्याला दरवाढ होत असून ती दोन रुपयांच्या पुढे देखील जात असल्याचे यातून स्पष्ट होते.

दिवाळीत पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. हा दिलास अद्याप कायम असून त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले नाहीत. मात्र आता सीएनजीचा भडका होत असल्याचे दिसते.

सीएनजीचे वाढलेले दर

तारीख - वाढलेलेली किंमत - दर (प्रतिकिलो)

  • १ जुलै २०२० - १ रुपये - ५४.८०

  • १० आॅक्टोंबर -२०२०- ९५ पैसे (दर कमी झाला)- ५३.८५

  • ०४ जानेवारी - १.६५ रुपये - ५५.५०

  • ४ जून - १.५० रुपये - ५६.६०

  • २ आॅगस्ट - ९० पैसे - ५७.५०

  • ४ आॅक्टोंबर - दोन रुपये - ५९.५०

  • १३ ऑक्टोबर - २.६० रुपये ६२.१०

  • १८ नोव्हेंबर - १.८० रुपये ६३.९०

18 नोव्हेंबरचे दर :

  • पेट्रोल - 109.50

  • पॉवर पेट्रोल - 113.50

  • डिझेल - 92.50

  • सीएनजी - 63.90 (प्रतिकिलो)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : एक सच्चा देशभक्त संसदेत पोहोचणार आहे- आशिष शेलार

SCROLL FOR NEXT