cng-fuel sakal
पुणे

पुणे : सीएनजी पुन्हा दोन रुपयांनी महागला

शहरात आता प्रति किलो ६६ रुपये दर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel)वाढत्या किंमतीपासून वाहन चालकांना गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळाला आहे. मात्र सीएनजी (CNG)वाहन वापरत असलेल्यांना बसत असलेला इंधन दरवाढीचा झटका अद्याप थांबलेला नाही. बुधवारी (ता. १३) सीएनजी दोन रुपये १० पैशांनी महागले आहे. त्यामुळे आता शहरात एक किलो सीएनजीसाठी ६६.०० रुपये मोजावे लागणार आहे.नोव्हेंबर २०२१ नंतर झालेली या वर्षातील ही पहिली दरवाढ आहे. त्यापूर्वी ऑगस्ट महिन्यात सीएनजी चार रुपये ६० पैशांनी महागला होता. चार आणि १४ ऑक्टोंबर रोजी अनुक्रमे दोन आणि २.६ रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली होती.

एकदाच महिन्यात चार रुपयांनी दरवाढ झाल्याची ती पहिलीच घटना होती.दिवाळीत पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. हा दिलासा अद्याप कायम असून त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले नाहीत. मात्र दिवाळीनंतर आता पुन्हा एकदा सीएनजीचे दर वाढले आहेत.

मी सीएनजी कार घेतली तेव्हा सीएनजीचा दर ५५ रुपये प्रतिकिलो होता. आता सीएनजीवर ६६ रुपयांवर पोचले आहे. पेट्रोल डिझेल परवडत नाही म्हणून सीएनजी कार वापरतो. मात्र आता सीएनजी देखील स्वस्त राहिले नाही. अशीच दरवाढ होत राहिली तर सीएनजीची किंमत पेट्रोल-डिझेल एवढी व्हायला वेळ लागणार नाही.

किशोर शिंदे, कार व्यावसायिक

सीएनजीचे वाढलेले दर

तारीख - वाढलेली किंमत - दर (प्रतिकिलो)

  • १ जुलै २०२० - १ रुपये - ५४.८०

  • १० ऑक्टोबर -२०२०- ९५ पैसे (दर कमी झाला)- ५३.८५

  • ०४ जानेवारी - २०२१ - १.६५ रुपये - ५५.५०

  • ४ जून - २०२१- १.५० रुपये - ५६.६०

  • २ ऑगस्ट - २०२१- ९० पैसे - ५७.५०

  • ४ ऑक्टोबर- २०२१- २ रुपये - ५९.५०

  • १३ ऑक्टोबर - २०२१- २.६० रुपये ६२.१०

  • १८ नोव्हेंबर - २०२१- १.८० रुपये ६३.९०

  • ११ जानेवारी - २०२२ - ६६.००

१३ जानेवारीचे दर :

  • पेट्रोल - १०९.५०

  • पॉवर पेट्रोल - ११३.५०

  • डिझेल - ९२.५०

  • सीएनजी - ६६.०० (प्रतिकिलो)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT