पुणे

चाकण एमआयडीसी परिसरातील कोसळलेला खांब प्रवाशांसाठी जीवघेणा

रुपेश बुट्टेपाटील

आंबेठाण : अपघातानंतर खाली कोसळलेला विजेचा खांब चार दिवस झाले तरी तसाच पडून असल्याने तो अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. प्रचंड वर्दळीच्या रस्त्यावर अशी धोकादायक स्थिती असताना एमआयडीसी अथवा वाहतूक विभाग त्याकडे गंभीरपणे पाहत नसल्याची वास्तव परिस्थिती आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का ? असा सवाल आता प्रवाशी विचारत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चाकण एमआयडीसीमधील एचपी चौक ते भांबोली फाटा या मार्गावरून प्रवास करताना हुंडाई कंपनीच्या अलीकडे खालूम्बरे गावाकडे जाणाऱ्या चौकात काही दिवसांपूर्वी अपघात घडला होता. यात वाहनांची धडक बसल्याने विजेचा खांब कोसळला होता.त्याचा काही भाग डांबरी रस्त्यावर आल्याने वाहनांना घासला जात आहे.बेसावध वाहन चालकांना याचा मोठा फटका बसत असून वाहनांचे नुकसान होत आहे.काही वेळेस या पडलेल्या खांबाला गाडी घासून दुचाकी आणि काही वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

या मार्गावर जवळच एमआयडीसीच्या माध्यमातून डांबरी करणाद्वारे रस्ता दुरुस्ती सुरू आहे. तरी देखील अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या लक्षात ही बाब का येत नाही असा सवाल उपस्थित होत आहे. भविष्यात अजून मोठी दुर्घटना घडू नये यासाठी तात्काळ हा पडलेला खांब तात्काळ दुरुस्त करण्याची गरज आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT