Swast-Dhanya-Ration 
पुणे

पुणे : विना रेशन कार्डधारकांनो, मोफत धान्य वितरणाला झालीय सुरुवात!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनच्या कालावधीत धान्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी विना रेशन कार्डधारकांना 8 जूनपासून तांदूळ आणि हरभरा मोफत वितरित करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 215 विना रेशन कार्डधारकांनी याचा लाभ घेतला आहे.

केंद्र सरकारमार्फत रेशन कार्डधारकांना मोफत गहू तांदूळ, तूर आणि चणा डाळ वितरित करण्यात येत आहे. परंतु ज्यांच्याकडे रेशन कार्डच नाही अशा व्यक्तींनाही आता सरकारने प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ आणि कुटुंबासाठी एक किलो हरभरा डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हे धान्य आठ जूनपासून वितरित करण्यात येत असल्याची माहिती अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून देण्यात आली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड  शहरासाठी 
-  83 स्वतंत्र केंद्र 
-  विना रेशनकार्ड एक लाख 39 हजार व्यक्तींना मोफत तांदूळ आणि डाळ देणार
- मे आणि जून महिन्याचे धान्य एकत्रित देणार

दोन दिवसांतील धान्य वाटप (विना रेशनकार्ड) : 
लाभार्थी : 215
तांदूळ : 2150 किलो 
हरभरा : 430 किलो

'वन नेशन वन रेशन कार्ड'  योजना :
केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना 'वन नेशन वन रेशन कार्ड' ही योजना 1 जूनपासून 20 राज्यांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे शिधापत्रिकाधारकांना देशाच्या कोणत्याही भागात रेशन दुकानातून धान्य खरेदी करता येईल. महाराष्ट्रात यापूर्वीच ही योजना सुरू आहे. त्यामुळे इतर राज्यातून किंवा शहरातून आलेल्या रेशन कार्डधारकांना पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून  गहू, तांदूळ देण्यात येतो.

रेशन कार्डधारकांचा आधार क्रमांक पॉस मशीनमध्ये लिंक करण्यात आला आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांनी कोठून धान्य घेतले, याची नोंद अन्नधान्य पुरवठा विभागाकडे होते, अशी माहिती पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT