Fraud sakal
पुणे

सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे कंपनीचे वाचले 77 लाख रुपये

कंपनीच्या कर्मचाऱ्याने बनावट आर्थिक व्यवहार करून कंपनीची तब्बल एक कोटी 22 लाख रुपयांची फसवणूक केली होती.

सकाळ वृत्तसेवा

कंपनीच्या कर्मचाऱ्याने बनावट आर्थिक व्यवहार करून कंपनीची तब्बल एक कोटी 22 लाख रुपयांची फसवणूक केली होती.

पुणे - कंपनीच्या कर्मचाऱ्याने बनावट आर्थिक व्यवहार (Economic Transaction) करून कंपनीची तब्बल एक कोटी 22 लाख रुपयांची फसवणूक (Cheating) केली होती. याबाबत सायबर पोलिसांकडे (Cyber Police) तक्रार (Complaint) दाखल होताच पोलिसांनी तत्काळ संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून कंपनीचे 77 लाख रुपये गोठविले. सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे कंपनीचे 77 लाख रुपये वाचले.

येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ए.एम.इन्फो वेब नावाची कंपनी आहे. या कंपनीमधील कर्मचारी रोहीत जोगळेकर याने बनावट व्यवहार करून कंपनीची एक कोटी 22 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केली होती. फसवणुक झालेली रक्कम रोझरपे, मायट्रॅव्हल डॉट कॉम व अन्य कंपन्यांच्या खात्यावर जमा झाले होते. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्याचबरोबर सायबर पोलिसांकडेही तक्रार देण्यात आली होती.

आर्थिक फसवणुक असल्याने सायबर पोलिसांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घातले. त्यावेळी सायबर पोलिस ठाण्यात रात्रपाळीला कर्तव्यावर असणारे पोलिस कर्मचारी नवनाथ कोंडे यांनी पैसे वर्ग केलेल्या रेझरपे या कंपनीस तत्काळ ईमेल करून फसवणूक झालेले पैसे गोठविण्यास सांगितले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक बलभिम ननवरे, महिला पोलिस कर्मचारी उमा पालवे, पुजा मांदळे यांनी अन्य माय ट्रॅव्हल डॉट कॉम व अन्य कंपन्यांशीही तत्काळ पत्रव्यवहार केला. त्यानंतर संबंधित कंपन्यांनी गोठविलेले पैसे परत फसवणुक झालेल्या कंपनीच्या बॅंक खात्यामध्ये जमा केले. सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे 77 लाख रुपयांची रक्कम परत मिळू शकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Whatsapp Storage Feature : स्टोरेज सतत फूल होतंय? व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं जबरदस्त फीचर; एका क्लिकमध्ये मॅनेज करता येणार मोबाईलचा स्पेस

Healthy Life: फक्त सकाळी जिम अन् डाएट करणे पुरेसे नाही, तर हृदयरोगतज्ज्ञांच्या मते 'या' गोष्टींही ठेवल्या पाहिजे लक्षात

दारूच्या ठेक्यावर कारवाई करायला पोलीस गेले, प्यायला गेलेल्यानं कार वेगात पळवली; ५ जणांचा चिरडून मृत्यू, अनेकजण जखमी

Amravati Child Abuse Case : संतापजनक! सावत्र मुलावर बापानं केला लैंगिक अत्याचार; स्वयंपाक घरात नेलं अन् जबरदस्तीनं त्याच्यावर..., आई पाहतच राहिली!

Delhi Tourism: दिल्लीकरांसाठी गुड न्यूज! लवकरच यमुना नदीवर क्रूझ सेवा सुरू, जाणून घ्या कोणते सुविधा मिळणार

SCROLL FOR NEXT