cock
cock 
पुणे

कोंबडा आरवत असल्याने पुणेकर पोलिस ठाण्यात!

सकाळवृत्तसेवा

पुणे : कधी एलियन (परग्रहवासी) दिसले म्हणून तर, कधी थेट चंद्रावर जमीन खरेदी करण्यासारख्या प्रकरणामध्ये पुणेकर आघाडीवर आहेत. त्यातच आता पहाटेच्यावेळी कोंबडा आरवल्यामुळे दररोज झोपमोड होते, म्हणून एका महिलेने चक्क कोंबडयाविरुद्ध थेट पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. हा प्रकार पुण्यातील सोमवार पेठेतील समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. 

पहाटेच्यावेळी कोंबडा आरवल्यामुळे आपली दररोज झोपमोड होते. म्हणून एका महिलेने कोंबडयाविरुद्ध थेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेचे नाव अद्याप उघड झाले नाही. अगोदरच पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे घडण्याच्या घटना सतत घडत आहेत. ते गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांचा जास्त वेळ जात आहे. त्यात महिलेने कोंबडयाविरुद्ध तक्रार केली, त्यामुळे कोंबडयाविरुद्ध किंवा त्याच्या मालकाविरुद्ध कुठला गुन्हा दाखल करायचा? काय कारवाई करायची? या प्रश्नामध्ये पोलिस अडकले आहेत. "कोंबडयामुळे झोपमोड होत असल्यामुळे आमच्याकडे तक्रार दाखल आहे." असे समर्थ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालकृष्ण कदम यांनी स्पष्ट केले आहे.

काही महिन्यांपूर्वी कोथरुडमधील एका नागरिकाला एलियन दिसला होता, त्याची दखल खुद्द पंतप्रधान कार्यालयाने घेऊन पुणे पोलिसांना "त्या" एलियन प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर दुसऱ्या एका प्रकरणात एका गृहीणीने चक्क 30-40 लाख रुपये खर्च करून चंद्रवर जमीन खरेदी केली होती. या प्रकरणत फसवणूक केल्यामुळे महिलेने पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. या दोन प्रकरणानंतर आता एक तिसरी घटना पुण्यात घडली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT