Complaints of holder of oRANGE card holders against shopkeepers 
पुणे

तुम्ही आमचे धान्य विकून खाल्ले; दुकानदारांविरुद्ध केशरी शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : "आम्हाला धान्य मोफत मिळणार आहे. मात्र, रास्त भाव दुकानदारांनी आमचे धान्य विकून खाल्ले आहे. दुकानदार चोर आहे'',अशा स्वरुपाच्या शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी अन्नधान्य पुरवठा विभागाकडे येत आहेत. तसेच केंद्र सरकारकडून देशातील 80 कोटी जनतेला मोफत धान्य मिळणार असल्याचाही गैरसमज लोकांमध्ये पसरला असल्याने दुकानदार आणि अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांना शिधापत्रिकाधारकांना समजावून सांगताना नाकीनऊ येत आहे. 

तम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शहरातील नागरिक विशेषतः केशरी शिधापत्रिकाधारक नगरसेवक, आमदार यांच्याकडे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी करत आहेत. मात्र, कोणत्या योजनेअंतर्गत धान्य वितरीत केले जात आहे, याची खातरजमा न करता शिधापत्रिकाधारक रास्त भाव दुकानांमध्ये धान्य खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तसेच ""मी केशरी शिधापत्रिकाधारक असून मला सध्या धान्याची गरज आहे. केंद्र सरकारने 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचे म्हटले आहे. त्यामध्ये आमचाही समावेश आहे. त्यामुळे, आम्हालाही मोफत धान्य मिळावे'', अशा अवास्तव मागण्या केशरी शिधापत्रिकाधारकांकडून दुकानदारांकडे केल्या जात आहेत. त्यामुळे, दुकानदार पुरते हैराण झाले आहेत. 

#Lockdown2.0 : निम्मे पिंपरी-चिंचवड सीलबंद
अन्नधान्य वितरण विभागाचे परिमंडल अधिकारी (अ व ज विभाग) दिनेश तावरे म्हणाले,"केशरी शिधापत्रिकांची ऑनलाईन नोंद असो वा नसो त्यांना 1 मे पासून धान्य देण्यात यावे, अशा सूचना रास्त भाव दुकानदारांना करण्यात आल्या आहेत. तसेच शिधापत्रिकाधारकाने इतर दुकानामधून धान्य खरेदी करु नये म्हणून त्यांच्या शिधापत्रिकेवर संबंधित दुकानदाराचे नाव, किती गहू आणि तांदूळ दिला याची नोंद अन्नधान्य वितरण विभागाच्या शिक्‍क्‍यानिशी केली जाईल. प्रत्येक केशरी शिधापत्रिकाधारकाला प्रतिकिलो 8 रुपये गहू आणि 12 रुपये तांदूळ या दराने प्रति एका व्यक्तीला 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देण्यात येणार आहे. एखाद्या कुटूंबातील 5 व्यक्तींची शिधापत्रिकेवर नोंद असल्यास त्या कुटूंबाला एकूण 15 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मिळेल.'' 

#Lockdown2.0 : निम्मे पिंपरी-चिंचवड सीलबंद
केशरी कार्डधारकांना 1 मे पासून धान्य मिळेल 
"केशरी शिधापत्रिकाधारकांना 1 मे पासून धान्य मिळणार आहे. त्यामुळे, शिधापत्रिकाधारकांनी 30 एप्रिलपर्यंत घराबाहेर पडून विनाकारण रास्त भाव दुकानांमधून गर्दी करु नये. अन्नधान्य वितरण विभागाकडे पुरेसा धान्यसाठा आहे. त्यामुळे, नाहक गडबडून जाऊ नये'', असे आवाहन दिनेश तावरे यांनी केले आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कान्हे शाखेच्यावतीने पीक कर्ज वाटपास सुरुवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi Babri Masjid : बाबरी मशीद पाडल्यावर सोनिया गांधींना कोसळलेले रडू; भाजप नेते म्हणाले- काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत

Mohammed Shami शिवाय भारतीय वेगवान गोलंदाजी अपूर्ण, तो न्यूझीलंड दौऱ्यात हवा होता, रवी शास्त्री स्पष्टच बोलले

ST Bus Service :दिवाळीसाठी वाशीम आगारातून बसफेऱ्यांत वाढ;प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून अतिरिक्त बससेवा

Latest Marathi News Live Update: अभिनेते रजनीकांत यांनी चेन्नईतील निवासस्थानाबाहेर चाहत्यांची घेतली भेट

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्या ट्रेड होणार, पण कोणता खेळाडू मुंबई संघात येणार? MI आणि पंजाब किंग्समधील डील अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT