बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील नव्याने मंजूर झालेले रस्ते निर्मिती तसेच सध्याच्या रस्त्यांची दुरुस्ती, नदी, ओढ्यांवरील पूल, साकव आणि अन्य कामांची सद्यस्थिती काय आहे? कुठली कामे पूर्ण झाली आहेत? कोणती अपूर्ण आहेत? याचा आढावा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत पावसाळ्यापूर्वी सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत, असे आदेश त्यांनी दिले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअधीक्षक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते. (Complete the approved road works immediately in Baramati says Supriya Sule)
भोर तालुक्यातील रायरी किल्ल्याकडे जाणारा रस्ता मंजूर असून त्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव तयार करावा. याबरोबरच तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या कामांसाठी मंजुरी मिळाली असली तरी अद्याप ती कामे सुरू झालेली नाहीत. ती तातडीने हाती घेऊन पूर्ण करावीत, अशी मागणी रणजीत शिवतरे आणि विक्रम खुटवड यांनी केली. त्यावर अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी आपण स्वतः या विषयात लक्ष घालून तातडीने कामे करून घेऊ, असे आश्वासन दिले.
बारामतीसह, पुरंदर, दौंड, मुळशी, वेल्हा या तालुक्याबरोबरच खडकवासला विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना जोडणारे विद्यमान रस्ते खराब झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी ओढे-नाल्यांवर पूल आणि साकव उभारणीची गरज आहे. रस्त्यांच्या साईड पट्ट्या खराब झाल्या आहेत. झाडे पडली आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार नाहीत. पावसाळा जवळ येतोय. तत्पूर्वी ही कामे पूर्ण झाली नाहीत, तर पावसात कामे करता येणार नाहीत. खड्ड्यांतून वाहतूक सुरू राहिली तर अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्राधान्यक्रमाने रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार लागलीच कामे हाती घेऊन चालू मे महिना अखेर कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
सासवड-जेजुरी मार्गाला उद्या भेट
सासवड जेजुरी मार्गावर कऱ्हा नदीच्या पुढे साधारण तीन किलोमीटर अंतरावर ओढ्यावरील पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा असून पुलाअभावी अपघात होत आहेत. गेल्या काही दिवसांत याठिकाणी दहा ते बारा छोटेमोठे अपघात झाले आहेत. कालच (ता. 10) याठिकाणी एक मोठा टँकर पलटी झाला. ही बाब पुरंदर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिली. याची दखल घेत सुप्रिया सुळे यांनी उद्या याठिकाणी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करण्याची सूचना केली. त्यानुसार पाहणी करून लागलीच काम सुरू करू, असे आश्वासन अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.