Palkhi Sohala Sakal
पुणे

आळंदीमध्ये पालखी सोहळ्याची सांगता

आषाढी वारीसाठी माउलींच्या चल पादुकांचे प्रस्थान देऊळवाड्यातून २ जुलैला झाले आणि चलपादुका सतरा दिवसांसाठी आजोळघरी विसावल्या.

सकाळ वृत्तसेवा

आळंदी - टाळ- मृदंगाचा निनाद आणि माउलीनामाचा (Sant Dnyaneshwar Maharaj) गजर करत माउलींच्या चल पादुकांचे (Paduka) मंदिर प्रदक्षिणा व दिंड्यांच्या (Dindi) हजेऱ्यांनी माउलींच्या प्रस्थान वारी सोहळ्याची सांगता झाली.

आषाढी वारीसाठी माउलींच्या चल पादुकांचे प्रस्थान देऊळवाड्यातून २ जुलैला झाले आणि चलपादुका सतरा दिवसांसाठी आजोळघरी विसावल्या. त्यानंतर १९ जुलैला माउलींचा पालखी सोहळा चाळीस वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपुरात पोहोचला. २० जुलै आषाढी एकादशी आणि २४ जुलैला गोपाळकाला करून सोहळा आळंदीत आल्यानंतर माउलींच्या चलपादुका आळंदीत परतल्यावर कारंजेमंडपात विसावल्या होत्या.

परंपरेनुसार मंगळवारी (ता. ३) माउलींच्या पादुका पालखी सोहळा प्रमुख राजाभाऊ आरफळकर यांनी हातात घेऊन समाधीसमोर स्थानापन्न केल्या. बुधवारी कामिका एकादशीनिमित्त परंपरेनुसार माउलींच्या चलपादुकांची मंदिर प्रदक्षिणा केली आणि दिंड्यांच्या हजेरी व मानकऱ्यांना नारळ प्रसाद देत आषाढी सोहळ्यासाठी सांगता झाली. या वेळी आळंदी देवस्थानचे सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मानकरी यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरलं! भररस्त्यात गोळीबार, वार करत खून; अज्ञात मारेकऱ्यांचा दिवसाढवळ्या धुमाकूळ..

Latest Marathi News Live Update : एकाच घरात दोन पक्ष; चंद्रपुरात पती-पत्नी वेगवेगळ्या पक्षांतून निवडणूक रिंगणात

Arvind Sawant : "त्यांना डॉबरमॅन म्हणायचे की मांजर?" अरविंद सावंतांचा सुधाकर बडगुजर यांना बोचरा सवाल

Marathwada Crime : मोबाइल घेण्यावरून वाद! आधी सिगारेटचे चटके दिले आणि नंतर चिरला गळा; चौघांवर गुन्हा, संशयिताला अटक

T20 World Cup 2026 : भारतात खेळा नाही तर...! ICC चा बांगलादेशला थेट इशारा, 'ती' मागणीही फेटाळली

SCROLL FOR NEXT