पुणे

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम; भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

ब्रिजमोहन पाटील

पुणे : 'एमएससी'ला प्रत्येक विषयाला पाच क्रेडीट स्कोर आहेत, पण त्यापैकी ७० टक्के अभ्यासक्रमावर परिक्षेत प्रश्न विचारणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयात वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासक्रम शिकवला गेला आहे, त्यामुळे हा ७० टक्के अभ्यासक्रम नेमका कोणता हे कळतच नाही. आम्ही अभ्यास एका भागाचा करून जाऊ आणि प्रश्न भलत्याच भागावर यायचे, त्याचा फटका आम्हाला बसणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने अभ्यासक्रम जाहीर केला पाहिजे, असे 'एमएससी' मायक्रो बायोलॉजी करणारा गणेश सांगत होता.

आॅक्टोबर महिन्यात अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉइस क्वेश्चन- एमसीक्यू) पद्धतीने घेतली जाणार आहे. मार्च महिन्यात कॉलेज अचानक बंद झाल्याने त्यामुळे परीक्षेसाठी ७० टक्के अभ्यासक्रम विचार घेतला जाणार आहे.

क्रेडिट चाॅईस बेस सिस्टिममुळे वेगवेगळ्या प्रकारे महाविद्यालयांना अभ्यासक्रम शिकविण्याची मुभा महाविद्यालयांना आहे. एका सेमिस्टरला पाच क्रेडिट असतात, त्यामध्ये काही महाविद्यालयात एक ते पाच असे क्रमाने शिकवतात, तर काही ठिकाणी अधलामधला धडा शिकवतात. पण आता ७० टक्के अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यामुळे नेमक्या कोणत्या क्रेडीटवर प्रश्न विचारले जाणार हे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सांगितले नाही, चौकशी केली तर अजून विद्यापीठाने स्पष्ट केले नाही अशी उत्तरे मिळत आहेत. यावर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

"आमचा अभ्यासक्रम पूर्ण शिकवला गेला गेला नाही त्यानंतर एक ते दोन धड्यांवर मी स्वतः अभ्यास केला. पण परीक्षेत ७० टक्के अभ्यासक्रम नेमका कोणता हे जाहीर झाली पाहिजे, असे सांगत एमबीएच्या शेवटच्या सेमिस्टरला असणारी तेजल जाधव हिने चिंता व्यक्त केली. अशीच गोंधळाची स्थिती सर्व प्रकारच्या पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांची आहे. परीक्षा तोंडावर आलेली असताना असा संभ्रम असल्याने याबाबत लवकर स्पष्टता यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

प्रश्न काढताना प्रत्येक अभ्यास मंडळाच्या प्रमुखांशी व सदस्यांशी चर्चा केली आहे. महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम कशा पद्धतीने शिकविला गेला आहे, याची माहिती घेऊन या परीक्षेचे प्रश्न काढले जातील. 'एमएससी' विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे यासाठी येत्या दोन दिवसात अभ्यास परीक्षेसाठी अभ्यासक्रम संकेतस्थळावर टाकला जाईल.-डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, पुणे विद्यापीठ

अनेक महाविद्यालयांनी अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. तरीपण विद्यार्थ्यांच्या सोईसाठी ७० टक्के अभ्यासक्रमाच्या पहिल्या तीन धड्यांवर व्यवस्थित अभ्यास करावा त्यामुळे गोंधळ होणार नाही.-डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, पुणे विद्यापीठ

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पदवी व बॅकलाॅगला १०० टक्के अभ्यासक्रमावर प्रश्न 
पदव्युत्तर पदवीसाठी ७० टक्के अभ्यासक्रम आहे. पण पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण संपला होता.  तर पदवी व पदव्युत्तर पदवीचे जे विषय बॅकलाॅग आहेत त्याचा पूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला गेला आहे. त्यामुळे सर्व विषयांच्या बॅकलाॅगच्या परीक्षांसाठी शंभर टक्के अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT