confusion on the rahatani center on the second paper of the XII exam 
पुणे

HSC Exam : बारावी परीक्षेच्या दुसऱ्या पेपरला केंद्रांवर गोंधळ 

सकाळवृत्तसेवा

 पिंपरी : बारावीच्या विद्यार्थ्यांचा  आज (ता.20)मराठी आणि  सिंधी भाषा  विषयाचा दुसरा पेपर होता. मात्र, रहाटणीतील एसएनबीपी परीक्षा केंद्रांवर मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांचे  ब्लॉक क्रमांकच फलकावर लिहिले नव्हते. त्यामुळे परीक्षार्थी व पालकांचा एकच गोंधळ उडाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विविध केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरु आहे. एक दिवसाच्या विश्रांती नंतर गुरुवारी (ता.20) मराठी व सिंधी भाषेचा पेपर होता.  परीक्षेला सकाळी अकरा वाजता सुरुवात होणार होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्धा तासाआधी म्हणजे १०.३० वाजता परीक्षा कक्षात आपल्या बैठक क्रमांकावर बसण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.  परंतु रहाटणीतील एसएनबीपी स्कुल परीक्षा  केंद्रांवर फक्त सिंधी विषयाच्या विद्यार्थ्यांचे ब्लॉक क्रमांक लिहिले होते. पण मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांचे ब्लॉक क्रमांक लिहिले नव्हते. त्यामुळे नेमक्या कुठल्या ब्लॉकमध्ये आसन क्रमांक असेल?  या विचाराने विद्यार्थी व पालकांची तारांबळ उडाली. विद्यार्थीनी पायल कुदळे हिचा आसन क्रमांक 215 होता. परंतु माहिती फलकावर केवळ 213 पर्यंतच क्रमांक लिहिले होते.
 

संबंधीत केंद्राच्या अनियोजनामुळे पायलची धांदल उडाली. परीक्षा खोली, बैठक क्रमांक शोधण्यामध्ये तिचा  बराच वेळ गेला.  परीक्षा केंद्रावर पालक प्रताप कुदळे यांनी  संताप व्यक्त केल्यानंतर "आमच्याकडे ब्लॉक क्रमांकची माहिती आहे. ती फलकावर लिहिली नसल्याची कबुली केंद्र प्रमुखांनी दिली. त्यानंतर १०.३० वाजता तिला  वर्गात सोडण्यात आले.

#PuneMetro मेट्रोच्या कामात भूसंपादनाचा अडथळा

दरम्यान मुख्याध्यापिका जयश्री वेंकटरामन यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्या उपलब्ध झाल्या नाहीत. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांनी संबंधित  परीक्षा केंद्राची चौकशी करण्यात येईल,  असे सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Assembly election results 2026 Live Update : पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं, जनशक्तीचा विजय : PM मोदी

Love Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक प्रेमात होतात अयशस्वी; हार्ट ब्रेकमुळे बनतात प्रचंड स्ट्रॉन्ग, जीवनात मिळवतात मोठं यश

West Bengal Result: बंगालचा विजय अचानक नाही! २०१४ मध्येच लिहिलेली विजयाची स्क्रिप्ट; १२ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ हिट, वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT