पुणे

शेती कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घालण्याचा केंद्र सरकारचा घाट : अॅड. रामहरी रुपनवर

संदीप जगदाळे

हडपसर : केंद्र सरकारने केलेल्या शेती विधेयक कायद्यांमागे बाजार समित्यांची यंत्रणा मुळापासून उध्वस्त करण्याचा आणि शेती कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घालण्याचा व शेतकऱ्यांना आधार भावाच्या संरक्षण कवचापासून कायमचे वंचित करण्याचा डाव आहे, अशी टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस माजी आमदार अँड. रामहरी रुपनवर यांनी केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली हडपसर विधानसभा व वानवडी काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी बचाव या व्हर्चुअल रॅलीचे प्रसारण व शेतकरी मेळाव्याचे आयोजन जांभुळकर गार्डन वानवडी येथे करण्यात आले होते. त्यावेळी रुपनवर बोलत होते. काँग्रेस शेतकरी मेळाव्यात ट्रॅक्टर रॅली काढून शेती विधेयकाला विरोध करण्यात आला.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रमेश बागवे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, मजदुर काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल शिंदे, प्रशांत तुपे, महाराष्ट्र युवक काँग्रेस सरचिटणीस अभिजित शिवरकर, चंद्रकांत मगर, सुनिल गायकवाड, विजय जाधव, नितीन आरु, चंद्रकांत ससाणे, कोमल वाणी, बाळासाहेब टिळेकर, खंडू लोंढे, संतोष सुपेकर, स्वप्निल डांगमाळी, शंभू जांभूळकर, दिनेश गिरमे आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवरकर म्हणाले, ''केंद्र सरकारने शेती आणि शेतकरी मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मोदींनी सुधारित कृषी विधेयक आणून देशातील कृषी बाजारपेठच मोडीत काढली आहे. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शेतकरी विरोधी कायदयाला सर्व स्तरातून विरोध होत आहे.''

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Latest Marathi News Live Update: राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती - अतुल सावे

SCROLL FOR NEXT