congress nana patole on bjp Chandrashekhar Bawankule Kasba peth bypoll mukta tilak politics news
congress nana patole on bjp Chandrashekhar Bawankule Kasba peth bypoll mukta tilak politics news  
पुणे

kasba Peth By-Election : तर टिळकांना उमेदवारी देऊ म्हणणाऱ्या बावनकुळेंना पटोलेंचं उत्तर…

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्याच्या राजकारणात पुण्यातील पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.यादरम्यान राजकीय प्रतिक्रियांन जोर आला आहे.

या दरम्यान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजून वेळ आहे उमेदवार बदलता येईल, असं खळबळजनक विधान केलं . यावर काँग्रेचे नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना फोन करून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र बावनकुळेंच्या वक्तव्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, आमचं त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही. त्यांनी काय करावं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे.

पटोले पुढे बोलताना पटोले म्हणाले की, यापूर्वी रजणी पाटील, पज्ञाताई सातव या दोन प्रकरणांमध्ये मी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन विनंती केली. परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. पण भाजपला मीडियाच्या माध्यमातून बोलायचं असेल तर हा विषय होत नाही. ही काही परंपरा नाहीये. त्यांना संस्कृती माहिती नसेल, आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. ते आमच्याशी बोलले देखील नाहीत असे नाना पटोले म्हणाले आहेत.

पुणे पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

बावनकुळे काय म्हणालेत..

पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या आवाहनानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना भाजपने ही उमेदवारी दिली नसल्याने निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार नसेल तर आम्ही टिळकांना उमेदवारी देऊ. महाविकासआघाडीने आजचं कळवलं तर उद्याचा दिवस बाकी आहे. निश्चित पणे तसा निर्णय घेता येईल, असे बावनकुळे म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT